agriculture news in marathi, Mahavitaran cuts electric supply of 1575 water supply projects | Agrowon

‘महावितरण’ने जिल्ह्यातील १५७५ पाणी योजनांचा वीजपुरवठा तोडला
टीम अॅग्रोवन
रविवार, 4 मार्च 2018

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांचे ३५ कोटी रुपयांचे वीजबिल थकल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने जिल्ह्यातील एक हजार ५७५ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांचे ३५ कोटी रुपयांचे वीजबिल थकल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने जिल्ह्यातील एक हजार ५७५ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. 

वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीने ५० टक्के वाटा उचलावा लागतो. उर्वरित ५० टक्के निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिला जातो. जिल्हा परिषदही जिल्हा नियोजन, केंद्र शासनाच्या योजना आणि सेस निधीचा ताळमेळ घालून हे पैसे देते. सध्या थकीत असलेल्या ३५ कोटींपैकी १६ कोटी रुपये देण्याचीही जिल्हा परिषदेची आर्थिक स्थिती नाही. राज्य सरकारच्या पुढाकारानेच हा प्रश्‍न आता सोडविला जाऊ शकतो. पण, महावितरण कंपनीकडूनही जिल्हा परिषदेला येणे आहे. महावितरणच्या वीज उपकेंद्र व इतर यंत्रणांसाठी ग्रामपंचायतीच्या जागा महावितरणने घेतल्या आहेत, याचा सेस त्यांनी अद्याप भरलेला नाही. 

          या रकमेची तालुकावार माहिती घेण्याचे आदेश आता गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पण, आता या वीज तोडलेल्या पाणी योजनाचे काय, हा प्रश्‍न आहे. त्यातच सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे यावर तातडीने जिल्हा परिषदेने निर्णय घेण्याची गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...