थकबाकीदार शेतक-यांना वीज बिले नवीन स्वरुपात

थकबाकीदार शेतक-यांना वीज देयके नवीन स्वरुपात
थकबाकीदार शेतक-यांना वीज देयके नवीन स्वरुपात

मुंबई  : राज्यातील कृषी पंपांची थकबाकी असणा़-या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ लागू करण्यात आलेली आहे. या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीनस्वरुपाची वीज देयके देण्यात येत असून त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची याची माहिती देण्यात आलेली आहे.

योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकयांच्या देयकात महावितरणच्या बोधचिन्हा शेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना- 2017 असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजूस 15 नोव्हेंबर 2017 पूर्वी शेतकऱ्यांनी किती रक्कम भरायची आहे याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 पर्यंत 5 हफ्त्यात किती रक्कम भरावी लागणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या शिवाय चौकटीत जून-2017 चे देयक या अगोदर वितरित करण्यात आले असून हे देयक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 अंतर्गत सहभागी होण्यासाठीतसेच थकीत रकमेचे सुलभ हप्ते माहित होण्यासाठी देण्यात येत आहे, असे नमुद केले आहे.

  या देयकात महावितरणकडून 30,000/- रुपयाच्या आत थकबाकी असणा-या ग्राहकांना 5 सुलभ हफ्ते तर 30,000/- पेक्षा जास्त असणा-या शेतक-यांना 10 सुलभ हफ्ते मिळणार आहेत याची सविस्तर माहितीही देयकात देण्यातआलेली आहे. तसेच, मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची ठळक वैशिष्ट्य काय आहेत याची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच थकबाकीचें हफ्ते नियमित भरणा-या शेतक-याना नेमका किती रुपयाचा दंड आणि व्याज माफकरण्याबाबत शासनाकडून विचार करण्यात येईल याचाही आकडा नमूद करण्यात आलेला आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषी संजिवनी योजनेत सहभागी होवून थकबाकीमुक्त व्हावे व महावितरणला सहकार्यकरावे असे आवाहन महावितरणने केले आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com