agriculture news in marathi, mahavitaran starts bill recovery movement in solapur | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात महावितरणची थकबाकी वसुली मोहीम
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सोलापूर : जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडे ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. ती थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. 

सोलापूर : जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडे ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. ती थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. 

महावितरणने थकबाकी वसुलीसाठी मोहीमच सुरू केली आहे. या मोहिमेमध्ये सहभागी जिल्ह्यातील जवळपास एक हजार १०० अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी जुनी मिल कंपाउंडमधील "बिजली भवन'' येथे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. या वेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर उपस्थित होते. सद्यःस्थितीत वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. 

शून्य थकबाकी मोहिमेत नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तसे चांगले काम झाले. परंतु, फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण थकबाकी वसूल करण्याच्या ध्येयानेच काम करणे आवश्‍यक आहे. थकबाकी असल्यास वीजपुरवठा खंडितच होणार, असा संदेश या मोहिमेद्वारे थकबाकीदारांना द्यावा, ही मोहीम आक्रमकपणे राबविली गेली पाहिजे व थकबाकी पूर्णपणे फेब्रुवारी महिन्यातच वसूल करण्याचे आदेशही ताकसांडे यांनी दिले. तर मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी सोलापूरला वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त करण्याचे आवाहन केले. 

वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. आक्रमकपणे सुरू झालेल्या थकबाकी वसुली मोहिमेत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांचे प्रमुख अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो जनमित्र सहभागी झाले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्‍शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरू करून घ्यावा लागणार आहे. 

याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल, तर त्यांच्याविरुद्ध तत्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. थकीत वीजबिलाचा संबंधित ग्राहकांनी तत्काळ भरणा करावा अन्यथा वीजपुरवठा खंडितच केला जाणार आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलाचा त्वरित भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...