बिल भरा; अन्यथा वीजपुरवठा खंडित

बिल भरा; अन्यथा वीजपुरवठा खंडित
बिल भरा; अन्यथा वीजपुरवठा खंडित

पुणे ः पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपधारक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी केले आहे.  पुणे परिमंडलात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक तसेच औद्योगिक वर्गवारीतील ६ लाख ८४ हजार ५६७ वीजग्राहकांकडे १७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर ८४ हजार ८० कृषिपंपधारकांकडे वीजबिलांपोटी २२६ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदार कृषिपंपधारकांनी एप्रिल २०१७ पासूनच्या चालू वीजबिलांचा भरणा केला नसल्यास कृषिपंपाचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील विविध महावितरणच्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेली आहेत. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे वीजग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. २८) व रविवारी (ता. २९) सुरू राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी आहे. सद्यस्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू आहे. वीजग्राहकांना वीजबिलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ''ऑनलाइन'' सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई नाईलाजास्तव करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com