agriculture news in marathi, Mahayuti's magic continued in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 मे 2019

नांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचा करिष्मा कायम राहिला आहे. काँग्रेसने नांदेड आणि हिंगोलीच्या जागा गमावल्या आहेत. औरंगाबादेत शिवसेनेच्या गडाला एमआयएमने सुरुंग लावला. 

नांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचा करिष्मा कायम राहिला आहे. काँग्रेसने नांदेड आणि हिंगोलीच्या जागा गमावल्या आहेत. औरंगाबादेत शिवसेनेच्या गडाला एमआयएमने सुरुंग लावला. 

गुरुवारी (ता.२३) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानयंत्रांतील मतमोजणीस सुरुवात झाली. औरंगाबाद वगळता अन्य सात मतदारसंघांत पहिल्या फेरीपासूनच महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी अखरेच्या फेरीपर्यंत कायम राहिल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. बहुतांश मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसला. भाजपची एक जागा वाढली, तर शिवसेनेने एक जागा जिंकली, तर एक जागा गमावली.

काँग्रेसचा दोन्ही जागी पराभव

२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना राज्यात काँग्रेसला केवळ नांदेड आणि हिंगोलीच्या जागांवर विजय मिळाला होता. परंतु, यंदा या दोन्ही जागी काँग्रेसचा पराभव झाला. नांदेड मतदारसंघात काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात चुरशीची लढत झाली. चिखलीकर यांनी सुरुवातीच्या फे-यापासून घेतलेली २० हजारांहून अधिक मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांनी दीड लाखांवर मते मिळाली. 

हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना सुरुवातीच्या फे-यापासून पिछाडीवर टाकलेले होते. पाटील आणि वानखेडे यांच्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक मताधिक्याचा फरक शेवटच्या कायम राहिला.

औरंगाबादमध्ये शिवसेनेला सुरुंग

औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या लढत झाली. काँग्रेसचे सुभाष झांबड चौथ्या स्थानांवर राहिले. सुरुवातीला जलील आणि जाधव यांच्यात आणि नंतर खैरे आणि जलील यांच्यात लढत झाली. जलील २२ हजार मतांनी आघाडीवर होते.

जालन्यात दानवे 
जालना मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात लढत झाली. अपेक्षेनुसार दानवे यांनी अडीच लाखांचे मताधिक्य घेतले होते.

परभणीत शिवसेनेचा बालेकिल्ला कायम, परंतु मताधिक्य घटले....
परभणी मतदारसंघात शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. शिवसेनेचे जाधव पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. मधल्या काही फे-यानंतर जाधव यांचे मताधिक्य कमी अधिक होत होते. जाधव २५ हजारांहून अधिक मताधिक्य होते. वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनी एक लाखाहून अधिक मते घेतली. शिवसेनेचा परभणीचा बालेकिल्ला कायम राहिला, परंतु मताधिक्यात मोठी घट झाली. 

बीडमध्ये मुंडे यांचा करिष्मा.....

बीड मतदारसंघात खासदार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली. प्रीतम मुंडे यांनी १ लाख ३० हजार मतांची आघाडी घेतली होती.

उस्मानाबादचा गड शिवसेनेने राखला....

उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह यांच्यामध्ये लढत झाली. निंबाळकर यांनी सुरुवातीला घेतलेली आघाडी कायम ठेवली. निंबाळकर यांनी १ लाख १३ हजारांचे मताधिक्य घेतले होते.

लातूरमध्ये भाजपला यश

लातूर मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांच्यात लढत झाली. शृंगारे यांना १ लाख ९० हजारांचे मताधिक्य होते.

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...