बीबीएफ २७ हजारांचे; खरेदी केले ४८ हजारांना
मनोज कापडे
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे : कंत्राटदारांचे भले करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील (एमएआयडीसी) तत्कालीन उपमहाव्यवस्थापकाने महामंडळाचा नफादेखील घटविला आहे. धक्कादायक बाब म्हणजे २७ हजारांचे बीबीएफ प्लान्टर ४८ हजारांना खरेदी केल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील तत्कालीन उपमहाव्यवस्थापक डी. के. सूर्यगण यांच्याविरोधात नियुक्त केलेल्या चौकशी समितीने गंभीर बाबी उघड केल्या आहेत. सूर्यगण यांना निलंबित करून पोलिसांकडे एफआरआर दाखल करण्याची शिफारस राज्य शासनाने करण्यात आली. 

पुणे : कंत्राटदारांचे भले करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील (एमएआयडीसी) तत्कालीन उपमहाव्यवस्थापकाने महामंडळाचा नफादेखील घटविला आहे. धक्कादायक बाब म्हणजे २७ हजारांचे बीबीएफ प्लान्टर ४८ हजारांना खरेदी केल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील तत्कालीन उपमहाव्यवस्थापक डी. के. सूर्यगण यांच्याविरोधात नियुक्त केलेल्या चौकशी समितीने गंभीर बाबी उघड केल्या आहेत. सूर्यगण यांना निलंबित करून पोलिसांकडे एफआरआर दाखल करण्याची शिफारस राज्य शासनाने करण्यात आली. 

महामंडळातील काही प्रामाणिक कर्मचाऱ्यांना वेठीस धरून व्यवस्थापनातील अधिकारी वर्ग मलिदा लाटण्यात मश्गुल झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामंडळाने एकूण पाच कोटी रुपयांच्या बीबीएफ आणि चार कोटी रुपयांच्या बैलगाड्या खरेदीत घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. 

 ''बीबीएफ प्लान्टर खरेदीत राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केलीच मात्र महामंडाळाचे सर्व्हिस मार्जिन (सेवाशुल्क) कमी करण्यात आले. त्यासाठी पेमेंट टर्म (बिले अदायगीची नियमावली) देखील परस्पर बदलण्यात आले, असे अहवालावरून स्पष्ट होते. 

कंत्राटदारांच्या निविदा मंजूर करताना कृषिउद्योग महामंडळाला स्वतःचा नफा आकारण्याचे देखील अधिकार आहेत. महामंडळाने सर्व उत्पादनांवर स्वतःचा नफा आतापर्यंत दहा टक्के ठेवला आहे. मात्र, बीबीएफसाठी पाच टक्के नफा ठेवण्यात आला. मुळात बीबीएफचे संशोधन हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे असल्यामुळे विद्यापीठाला देखील रॉयल्टी द्यावे लागते. ''कंत्राटदाराला सवलती देण्याच्या भानगडीत कृषी विद्यापीठाला दोन टक्के रॉयल्टी देण्याचा मुद्दा बाजूला सारण्यात आला. त्यामुळे विद्यापीठाची रॉयल्टी महामंडळाला आपल्या नफ्यातून द्यावी लागली, असे कृषी अभियांत्रिकी विभागाच्या लेखा व्यवस्थापकाने अहवालात नमूद केले आहे. 

कमी दराच्या निविदेकडे दुर्लक्ष
राज्यात शेतक-यांसाठी २०१४ मध्ये ''कृषिउद्योग मेक बीबीएफ प्लान्टर'' पुरविण्यासाठी सर्वप्रथम निविदा काढण्यात आली होती. चौकशी अहवाल असे म्हणतो, की निविदांमध्ये सर्वांत कमी दर २७ हजार रुपये होता. मात्र, कमी दराची निविदा असून कृषी अभियांत्रिकी विभागाने दुर्लक्ष केले. त्याऐवजी पुण्याच्या एका कंपनीचा ४६ हजार रुपयाचा दर निश्चित करण्यात आला. त्यानंतर बीबीएफची विक्री किंमत ४८ हजार इतका निश्चित करण्यात आला.'' 

 गैरव्यवहार चौकशीच्या अहवालातील मुख्य मुद्दे

  • निविदा प्रक्रियेत भाग न घेतलेल्या ठेकेदारांना कंत्राटे वाटली 
  • शेतकऱ्यांना निकृष्ट बैलगाड्या वाटूनही ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले नाही
  • बीबीएफ खरेदीत पहिल्या क्रमांकाची कमी किमतीची निविदा मंजूर न करता जादा किमतीची चौथ्या क्रमांकाची निविदा मंजूर केली
  • सोलर स्प्रेअर व ग्लोबल ट्रेडिंगच्या अपात्र निविदा पात्र दाखविल्या
  • स्प्रेपंपाचे दर कमी असतानाही जाणिवपूर्वक दर वाढवून दिले
  • रॉयल्टी प्रकरणात महामंडळाचे सात टक्के आर्थिक नुकसान झाले

इतर ताज्या घडामोडी
चार हजार एकरांतील बटाटा पीक गेले वायामंचर, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात सातगाव पठार...
मन्याड, बहुळा प्रकल्पांतील पाणीसाठ्यात... जळगाव : जिल्ह्यातील मृतसाठा स्थितीत गेलेले...
अकोला जिल्ह्यात करार तत्त्वावर पिकणार... अकोला ः केळीच्या उत्पादनासाठी जिल्ह्यातील अकोट...
तब्बल २५१ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा...जळगाव : जिल्हाभरातील जवळपास २५१...
साडेसहा हजार शेतकऱ्यांचे तुरीचे चुकारे...परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १५०० ते १६००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पर्यावरणपूरक उपायातून पोल्ट्री...कॅनडा : येथील अंडी व त्यापासून पदार्थांचा वापर...
हरभरा पीक प्रात्यक्षिकातून धुळ्याला...धुळे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत...
बेळगाव जिल्ह्यात ऊसटंचाईने गाळप... संकेश्‍वर, कर्नाटक ः बेळगाव जिल्ह्यातील काही...
शेतमाल विपणन यंत्रणा बदलायला हवी ः मोदी नवी दिल्ली ः शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत...
प्रशासनाला समजते आंदोलनांचीच भाषा अकोला ः शासनाने या हंगामात सुरवातीला हमीभाव व...
तुरळक ठिकाणी हलक्‍या सरींचा अंदाजपुणे ः सध्या राज्यात अनेक भागांतील हवेचा दाब 1004...
रयत क्रांतीसमोर संघटना बांधणीचे अाव्हान कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९३ टक्‍क्‍...सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट...
वऱ्हाडात पिकांचे नुकसान; प्रकल्पांतील...अकोला : गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
पालघर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसानवाडा, जि. पालघर  : तालुक्‍यात दोन दिवस...
खानदेशात पाऊस, वाऱ्यामुळे पूर्वहंगामी...जळगाव  ः जिल्ह्यासह नंदुरबार व धुळे...
कसमादे पट्टयात पावसामुळे कांदा पिकाला...देवळा, जि. नाशिक : येथील देवळा- चांदवडसह कसमादे...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या भावना...जळगाव : कर्जमाफीची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी राज्य...
सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना...सोलापूर  ः पुणे जिल्ह्याकडून उजनी धरणाच्या...