'कृषी उद्योग'मधील भ्रष्टाचाराची शस्त्रक्रिया
मनोज कापडे
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील (एमएआयडीसी) आर्थिक अनागोंदीला लगाम घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बीबीएफ ते इतर औजारांमधील घोटाळ्यात चर्चेत असलेले उच्चपदस्थ अधिकारी डी. के. सूर्यगण यांच्या विरोधात थेट खटला भरण्याची तयारी सुरू झाल्यामुळे महामंडळातील भ्रष्ट लॉबी हादरली आहे. 

पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील (एमएआयडीसी) आर्थिक अनागोंदीला लगाम घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बीबीएफ ते इतर औजारांमधील घोटाळ्यात चर्चेत असलेले उच्चपदस्थ अधिकारी डी. के. सूर्यगण यांच्या विरोधात थेट खटला भरण्याची तयारी सुरू झाल्यामुळे महामंडळातील भ्रष्ट लॉबी हादरली आहे. 

महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी एक गोपनीय चौकशी अहवाल राज्याच्या प्रधान कृषी सचिव बिजयकुमार यांना पाठविला आहे. माजी उपमहाव्यवस्थापक डी. के. सूर्यगण यांच्या कार्यकाळात निविदा प्रक्रियेत अनियमितता, गैरशिस्त आणि गैरकारभार दिसून येतो. शासनाने मान्य केलेल्या सामायिक यादीप्रमाणे सूर्यगण यांची विभागीय चौकशी ही सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे सोपविण्याचे प्रस्तावित आहे, असे या अहवालात म्हटले आहे. 

व्यवस्थापकीय संचालक करंजकर तसेच कृषिमंत्र्यांकडेही पाठविलेल्या या अहवालात सूर्यगण यांच्यावर पोलिस खात्यात प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची परवानगी मागण्यात आलेली आहे. 

‘भविष्यात महामंडळाची बदनामी होऊ नये यासाठी सूर्यगण यांच्याकडून आरोपपत्राद्वारे खुलासा मागवून चौकशी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी. मात्र, त्याआधी सूर्यगण यांना निलंबित करून एफआयआर दाखल करण्यासाठी आदेश प्राप्त व्हावेत. तशी मंजुरी मिळताच सूर्यगण यांच्या विरोधात एफआरआर दाखल करण्यासाठी उपमहाव्यवस्थापक (कृषी अभियांत्रिकी) यांना आदेश देण्यात येतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  
 
बैलगाडी ते बीबीएफपर्यंत पैशांची गंगा
कृषी उद्योग महामंडळात पद्धतशीर साखळी तयार झाल्यामुळे महामंडळात बैलगाड्यांपासून ते बीबीएफ प्लांटरपर्यंत सर्वच कंत्राटांमध्ये पैशांची गंगा वाहिली आहे. त्यात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी आपले हात धुऊन घेतल्याचे मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. सूर्यगण यांनी निविदा न काढताच ठेकेदारांशी खरेदीचे व्यवहार केले होते. चौकशीत ते दोषी आढळले आहेत. ‘बीबीएफ प्लांटरसाठी वर्धा येथील एका फर्मला निविदेनुसार कंत्राट मिळाले होते. मात्र, निविदेत भाग घेतलेले नसतानाही विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन फर्मची बीबीएफ प्लांटरचे कंत्राट बहाल करण्यात आले,’ असे अहवाल सांगतो. 

खुलासा आल्यानंतर कारवाई ः कृषिमंत्री  पांडुरंग फुंडकर
कृषी उद्योग महामंडळातील विविध घोटाळ्यांबाबत ठपका ठेवण्यात आलेले तत्कालीन उपमहाव्यवस्थापक डी. के. सूर्यगण यांच्या चौकशीचा अहवाल कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनादेखील पाठविण्यात आलेला आहे. ‘या प्रकरणाची चौकशी झालेली आहे. कारवाई होईल. सूर्यगण यांच्यावर ठेवलेल्या आरोपांबाबत शासनाने खुलासा मागविला आहे. खुलासा आल्यानंतर कारवाई होईल,’ अशी माहिती कृषिमंत्री फुंडकर यांनी दिली. 

अॅग्रो इफेक्ट 
अॅग्रोवनने केला होता गैरव्यवहाराचा पाठपुरावा 

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उद्योग महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या बीबीएफ प्लांटरमधील गैरव्यवहार अॅग्रोवनकडून सर्वप्रथम उघडकीस आणला गेला. एका सविस्तर मालिकेमधून बीबीएफमधील तांत्रिक घोटाळा व त्यात शासकीय अनुदानाची झालेली हानी यावर प्रकाश टाकला गेला होता. याशिवाय ॲग्रोवनमध्ये या संदर्भात इतर अनेक बातम्या, लेखांसह पाठपुरावा करण्यात आला. यामुळे विधिमंडळातदेखील चर्चा घडून आली. कृषी उद्योग महामंडळाने घेतलेल्या चुकीच्या भूमिकेचा फायदा घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनदेखील कोट्यवधींची अौजार खरेदी झाली होती. अॅग्रोवनकडून आणखी एका मालिकेद्वारे या खरेदीचा भांडाफोड करण्यात आला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा महामोर्चा :...जळगाव : भाजपातून आउटगोइंग सुरू झाले, त्यांचे...
सहकार विकास महामंडळ विसर्जित करण्याची...पुणे ः सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करून...
कांदा दर अजून सव्वा महिना टिकून राहतील...नाशिक : लासलगाव बाजार समितीत सोमवारी (ता.25)...
मत्स्य़पालन ठरले फायदेशीर आसेगाव (जि. वाशिम) येथील खानझोडे बंधू यांनी...
कर्जमाफी अर्जांची साठ टक्के छाननी झाली...मुंबई ः शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाइन...
फवारणी यंत्राच्या कल्पक निर्मितीतून वेळ...एकीकडे शेतीत यांत्रिकीकरण वाढत आहे, तर दुसरीकडे...
सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान हवामान :  तीनही हंगामात लागवड शक्‍य...
बाजार समित्या रद्द केल्यास किंमत मोजावी...मुंबई ः सरकारची धोरणे रोज बदलत आहेत. बाजार...
नाशिक जिल्ह्यातील १६ धरणे तुडुंब नाशिक  : जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह,...
मूग, उडीद पीककापणीची माहिती २८ पर्यंत...मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मूग आणि...
गरज पडल्यास अाणखी साखर अायात : केंद्रीय...नवी दिल्ली: देशात जर साखरेची गरज पडल्यास अाणखी...
जळगाव जिल्ह्यात ‘कृषी’ संबंधित ३९९ पदे...जळगाव ः जिल्ह्यात राज्य शासनांतर्गत असलेल्या...
भातावर करपा, तांबेरा, पाने गुंडाळणारी...कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असला...
पूर्व विदर्भात धानावर गादमाशी,...नागपूर ः पूर्व विदर्भात यंदा पावसाअभावी ८० टक्‍के...
भेंडी पिकात कमीत कमी निविष्ठा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
मॉन्सून २८ पासून परतीच्या मार्गावरपुणे : सध्या राजस्थानच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
रब्बी हंगामासाठी सुधारित अवजारेरब्बी हंगामाचा विचार करता मजुरांची उपलब्धता व...
ऊस उत्पादकांच्या खिशाला ३६१ कोटींची...सोलापूर ः राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडूनही भाग...
कर्जमाफीतील पाचर ऊस उत्पादकांच्या मुळावरमुंबई : कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे नियमित...
लिंगभेद मानण्याची मनोवृत्ती बदलावीपुणे ः ‘मुलगाच पाहिजे’चा कुटुंबातून होणारा...