agriculture news in marathi, maize arrival and rate status, khandesh, maharashtra | Agrowon

खानदेशात मक्याची आवक नगण्य
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जानेवारी 2019

मक्‍याचे दर १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. परंतु आवकच नाही. कारण शेतकऱ्यांकडे मका नाही. पुढेही आवक कमीच राहील, कारण जळगाव किंवा इतर भागात अमेरिकन लष्करी अळीमुळे मका पीक जेमतेम आहे. 
- कैलास चौधरी, संचालक, जळगाव बाजार समिती.

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्‍याची आवक अगदी नगण्य असून, दरातही मागील १०-१२ दिवसांत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. परंतु या दराचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. कारण शेतकऱ्यांकडे मका उपलब्ध नसल्याचा मुद्दा काही शेतकरी व बाजार समितीच्या संचालकांनी मांडला आहे. 

जळगाव, पाचोरा, अमळनेर, धुळ्यातील दोंडाईचा व शिरपूर आणि नंदुरबार व शहादा या बाजार समित्यांमध्ये मक्‍याची अधिक आवक होते. खरिपात मका लागवड कमी असते. तरीदेखील फेब्रुवारीअखेरपर्यंत आवक सुरू असते. परंतु यंदा दुष्काळी स्थितीचा फटका सर्वत्र बसल्याने मक्‍याची आवक रखडतच सुरू होती. जळगाव जिल्ह्यातील १२ शासकीय खरेदी केंद्रांत फक्त २०० क्विंटल मक्‍याची आवक झाली. कारण मक्‍याला बाजारात हमीभावाइतके दर होते. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आवक अगदी कमी झाली. 

जळगाव, अमळनेर येथील बाजारात प्रतिदिन मिळून १०० क्विंटलही आवक होत नसल्याची स्थिती आहे. आवक नगण्य असल्याने दरात काहीशी वाढ झाली असून, ते १९०० रुपयांपर्यंत पोचले आहे. खानदेशात रब्बी हंगामात मक्‍याची २० हजार हेक्‍टरवरही लागवड झालेली नाही. 

मागील हंगामात मक्‍याची एकट्या जळगाव जिल्ह्यात ७० हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. आवक मार्चपासून वाढली. ती जूनअखेरपर्यंत कायम होती. कमाल दर १२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले होते. परंतु यंदा खरिपातील मक्‍यास १७०० पर्यंत दर मिळाले. सद्यःस्थितीत जे दर आहेत, ते पुढेही टिकून राहतील, कारण मार्चपर्यंत आवक वाढणार नाही. मागील हंगामाच्या तुलनेत या रब्बीमधील मक्‍याचे दर किमान १५०० रुपयांपर्यंत राहतील, असा अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सूत्रांनी व्यक्त केला. 
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...