Agriculture News in Marathi, maize consumption likely to increase, world, International Grains Counci report | Agrowon

जगात मक्याचा वापर वाढणार
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 26 नोव्हेंबर 2017
नवी दिल्ली ः  यंदा (२०१७-१८) जगातील मका उत्पादन १०४० दशलक्ष टनांवर पोचण्याची शक्यता अाहे. जागतिक स्तरावर मक्याचा वापर वाढणार असल्याचा अंदाज अांतरराष्ट्रीय धान्य परिषदेने (अायजीसी) व्यक्त केला अाहे.
 
मक्याचा वापर २.७ दशलक्ष टनांनी वाढून १०६९ दशलक्ष टनांवर जाईल, असे ‘अायजीसी’ने मासिक अहवालात म्हटले अाहे. अाॅक्टोबर महिन्यात जाहीर केलेल्या अंदाज अहवालात जगात मका उत्पादन १०३४ दशलक्ष टन होईल, असे म्हटले होते. त्यात अाता अाणखी वाढ होणार असल्याचे नोव्हेंबरमधील अहवालात नमूद केले अाहे. 
 
नवी दिल्ली ः  यंदा (२०१७-१८) जगातील मका उत्पादन १०४० दशलक्ष टनांवर पोचण्याची शक्यता अाहे. जागतिक स्तरावर मक्याचा वापर वाढणार असल्याचा अंदाज अांतरराष्ट्रीय धान्य परिषदेने (अायजीसी) व्यक्त केला अाहे.
 
मक्याचा वापर २.७ दशलक्ष टनांनी वाढून १०६९ दशलक्ष टनांवर जाईल, असे ‘अायजीसी’ने मासिक अहवालात म्हटले अाहे. अाॅक्टोबर महिन्यात जाहीर केलेल्या अंदाज अहवालात जगात मका उत्पादन १०३४ दशलक्ष टन होईल, असे म्हटले होते. त्यात अाता अाणखी वाढ होणार असल्याचे नोव्हेंबरमधील अहवालात नमूद केले अाहे. 
 
अमेरिका, युरोपीय देश, रशिया अाणि चीनमध्ये मक्याचा वापर वाढणार अाहे. जागतिक स्तरावर वापर वाढूनही मक्याच्या शिल्लक साठा अधिक राहणार अाहे. जगातील शिल्लक साठा २०६ दशलक्ष टन राहणार अाहे, असे धान्य परिषदेने म्हटले अाहे. 
 
गव्हाचे उत्पादन ७४९ दशलक्ष टनांवर पोचणार
गव्हाचे जागतिक स्तरावरील उत्पादन वाढून ते ७४९ दशलक्ष टनांवर पोचेल. विशेषतः रशियातील गहू उत्पादन वाढणार अाहे. तर युरोपीय देशांमधील उत्पादन कमी होणार अाहे. गव्हाचा वापर ७४१.६ दशलक्ष टन राहील. तर शिल्लक साठा २ लाख टनांनी कमी होऊन तो २४९ दशलक्ष टनांपर्यंत खाली येईल, असे अहवालात म्हटले अाहे.
 
सोयाबीन उत्पादनात घटीचे संकेत
यंदा जगातील भात उत्पादन ४८२ दशलक्ष टन होईल. तर वापर ४८४ दशलक्ष टन राहील, असा अंदाज धान्य परिषदेने व्यक्त केला अाहे. तर सोयाबीन उत्पादन ३४८ दशलक्ष टनांवर पोचेल.
 
गेल्या वर्षी ३५० दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. यंदा त्यात काही प्रमाणात घट होणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहेत. जागतिक स्तरावर सोयाबीन व्यापारात वाढ होऊन तो १५३ दशलक्ष टनांपर्यंत जाईल, असेही नमूद करण्यात अाले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...