agriculture news in Marathi, Maize procurement below 25 percent in Jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात २५ टक्केही मका खरेदी नाही
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

शेतकऱ्यांचा मका कमीत कमी प्रमाणात कसा खरेदी करता येईल, याचाच विचार शासकीय यंत्रणा करतात. कारण व्यापारी धार्जीणे धोरण आहे. शेतकरी हिताचे धोरण असते तर किमान निम्मा मका तरी शासकीय खरेदी केंद्रात खरेदी केला असता व खरेदीला मुदतवाढ दिली असती. 
- अनिल पाटील, शेतकरी, सावखेडासीम, जि. जळगाव.

जळगाव ः जिल्ह्यात खरिपात जेवढे मक्‍याचे उत्पादन झाले, पैकी २५ टक्के मक्‍याची खरेदीदेखील शासनाच्या खरेदी केंद्रात झालेली नाही. शेतकऱ्यांना आपला मका व्यापाऱ्यांच्या खिशात घालावा लागला. 

शासन टार्गेट ठरवून काम करीत असल्याचा मुद्दा या खरेदीच्या प्रकारामुळे उपस्थित झाला असून, हमीभावाचा फक्त गाजावाजाच अधिक केला जात असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात खरिपात ज्वारीसह मक्‍याची पेरणी अधिक असते. यंदा सुमारे ९० लाख हेक्‍टरवर पेरणी झाली होती. रावेर, यावल, मुक्ताईनगर, पाचोरा, चोपडा हे तालुके मका उत्पादनात आघाडीवर आहेत. 

यंदा २७ लाख क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती; परंतु अनियमित पावसाचा फटका बसल्याने मक्‍याचे उत्पादन घटले. त्यात ३० ते ४० टक्के घट झाल्याचे तज्ज्ञांसह शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जसे उत्पादन घटले, तसा फटका दरांबाबतही बसला आहे. शासनाने १४२५ रुपये हमीभाव मक्‍याला जाहीर केला होता, परंतु एवढा दर सर्व मका उत्पादकांना मिळाला नाही, कारण शासकीय मका खरेदी केंद्रात आजघडीला फक्त ३० हजार क्विंटल मक्‍याची खरेदी झाली आहे. जेवढा मका जिल्ह्यात उत्पादित झाला, त्यापैकी शासकीय खरेदी केंद्रात २५ टक्के मका खरेदीदेखील झालेली नसल्याचे यातून समोर आले आहे. 

१२ पैकी नऊच केंद्रे होती सुरू
जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडा, मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, भुसावळ, पारोळा आणि जामनेर येथे नोव्हेंबर महिन्यात मार्केटिंग फेडरेशनने शासकीय मका खरेदी केंद्रे सुरू केली. यातील पाचोरा, भडगाव व चाळीसगाव या केंद्रांवर मका आवक न झाल्याने ते बंद करावे लागल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडून मिळाली. उर्वरित नऊ केंद्रे ३१ डिसेंबरपर्यंत सुरू होती. तर ३१ डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती, त्यांच्या मक्‍याची खरेदी ३१ डिसेंबरनंतरही सुरूच ठेवली. अशी आजअखेर ३० हजार क्विंटल एकूण मका खरेदी नऊ केंद्रांवर झाली आहे, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनचे पणन अधिकारी परिमल साळुंखे यांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...