जळगाव जिल्ह्यात मका आवक निम्म्यावर; दर स्थिर

मका
मका

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्‍याची आवक निम्म्यावर आली आहे. त्यामुळे दर टिकून आहेत.

चाळीसगाव, रावेर, यावल, चोपडा, पाचोरा व जळगाव बाजार समितीत मक्‍याची आवक अधिक होती. अमळनेरात कमी आवक होती. यंदा रावेरमध्ये लागवड कमी होती. परंतु मे महिन्यात आवक वाढतच होती. त्यामुळे दरांवर दबाव होता. यंदा मक्‍याचे दर ९०० ते ११०० रुपये असे एप्रिल व मे महिन्यात होते. दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु घरात अधिक दिवस मक्‍याची साठवणूक करणे शक्‍य नसल्याने बाजारात मका आणला जात होता.

रावेर येथे मे महिन्यात प्रतिदिन एक हजार क्विंटल मका आवक सुरू होती. चोपडा व जळगाव येथे प्रतिदिन सुमारे ८०० क्विंटल मका आवक होती. पाचोरा व चाळीसगावातही प्रतिदिन सुमारे ३०० ते ३५० क्विंटल आवक होती. आवक कायम असल्याने दरात फारशी वाढ नव्हती. मग जून जसा सुरू झाला, तशी आवक कमी झाली. आजघडीला आवक निम्म्यावर आली आहे.

पाचोरा, चाळीसगाव बाजारातील आवक पुढील आठवड्यात बंद होईल. जळगाव, रावेर, चोपडा येथे आवक सुरू असून, ती प्रतिदिन सुमारे ३०० क्विंटलपर्यंत आहे. आवक कमी होताच दर सुधारले. सध्या मक्‍याला १२५० रुपये क्विंटल  दर आहे. हा दर पुढे आणखी वाढू शकतो. कारण आवक जवळपास बंद होईल. जळगाव व रावेरात जशी आवक कमी झाली, तसे व्यापारी  खेडा खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना जागेवर १२०० रुपये क्विंटलचा दर मका खरेदीसाठी काही व्यापारी देत आहेत, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com