agriculture news in marathi, Maize rate ups in Jalgaon District APMC's | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील बाजारांमध्ये मका दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 मे 2018

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा, रावेर, जळगाव आणि चाळीसगाव येथील बाजार समितीमध्ये मक्‍याची आवक घटली असून, दरात सुधारणा झाली आहे. 

जळगाव बाजार समितीत मागील आठवड्यातच आवक निम्म्यावर आली आहे. या बाजारात प्रतिदिन ४०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. चाळीसगाव बाजार समितीत प्रतिदिन १८०० क्विंटलपर्यंत आवक आहे; तर रावेर व चोपडा बाजार समितीत मागील पंधरवड्यात प्रतिदिन ११०० क्विंटल आवक झाली. आवक कमी होत असतानाच दरात सुधारणा होत आहे.

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा, रावेर, जळगाव आणि चाळीसगाव येथील बाजार समितीमध्ये मक्‍याची आवक घटली असून, दरात सुधारणा झाली आहे. 

जळगाव बाजार समितीत मागील आठवड्यातच आवक निम्म्यावर आली आहे. या बाजारात प्रतिदिन ४०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. चाळीसगाव बाजार समितीत प्रतिदिन १८०० क्विंटलपर्यंत आवक आहे; तर रावेर व चोपडा बाजार समितीत मागील पंधरवड्यात प्रतिदिन ११०० क्विंटल आवक झाली. आवक कमी होत असतानाच दरात सुधारणा होत आहे.

या महिन्याच्या सुरवातीला महिनाभर उधारीने १२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात बाजार समित्यांमध्ये मक्‍याची खरेदी केली जात होती. मका विक्रीनंतर लागलीच रोकड हवी असेल, तर १०७५ रुपये प्रतिक्विंटलचे दर दिले जात होते; परंतु जिल्ह्यात रब्बी हंगामात मक्‍याची पेरणी किंवा लागवड कमी झाली होती. रावेर, यावल भागात हरभऱ्याची पेरणी अधिक होती. पेरणी फक्त चोपडा, जळगाव, पाचोरा, मुक्ताईनगर भागात बऱ्यापैकी झाली होती.

मकामळणी फेब्रुवारीतच अनेक ठिकाणी सुरू झाली. सुरवातीलाही कमी दर होते. मार्चअखेरपर्यंत कमाल मका उत्पादकांनी मळणी करून मका बाजारात विक्रीसाठी आणला. त्यामुळे प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्‍याची आवक घटली आहे. पुढील आठ १० दिवसांत आवक आणखी कमी होईल. मका उपलब्ध होत नसल्याने अनेक व्यापारी थेट गावांमध्ये जाऊन मक्‍याची खेडा खरेदी करीत आहेत. ही खरेदी आणखी १० ते १२ दिवस सुरू राहील. यानंतर आवक जवळपास शून्यावर राहील, असे व्यापारी व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
सिंचनाच्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या...शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून,...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...