दुष्काळी स्थितीत प्राधान्याने उपाययोजना करा ः पी. शिवशंकर

दुष्काळी स्थितीत प्राधान्याने उपाययोजना करा ः पी. शिवशंकर
दुष्काळी स्थितीत प्राधान्याने उपाययोजना करा ः पी. शिवशंकर

परभणीः परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व शासकीय यंत्रणांनी या दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले.

दुष्काळी परिस्थितीतील कामकाजाच्या आढावा बैठकीमध्ये श्री. शिवशंकर बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, सर्व यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

टंचाईग्रस्त गावातील पिण्याचे पाणीपुरवठ्याचे सविस्तर प्रस्ताव घ्यावेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन गावनिहाय पाणीपुरवठ्याचा आराखडा तयार करावा. विविध उपाययोजना आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनांची गरज तपासून इतर उपाययोजनांच्याही गरजा तपासण्याची कार्यवाही करावी. सध्याच्या पाणीपुरवठा योजना, अपूर्ण योजनांचाही आढावा घेतला गेला पाहिजे. वीज देयके न भरल्यामुळे पाणीपुरवठा योजना खंडित असेल तर त्याची यादी करून सवलतीचा फायदा घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. विहीर अधिग्रहणाच्या संदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी. 

यावर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी करताना चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना केली. चारा पीक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले असून पशुसंवर्धन विभागाने ही योजना अधिक प्रभावीपणे राबवावी. सर्व तालुक्यांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांनी मनरेगाअंतर्गत सेल्फवरील काम वाढविण्यासाठी मागणीचे प्रस्ताव घ्यावेत, मनरेगाची कामे मजुरांना उपलब्ध करून द्यावीत. शोषखड्ड्यांची कामे गावांनी हाती घेतली पाहिजेत, त्याशिवाय विहिरींना मान्यता देता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com