agriculture news in marathi, Make stamps available in the new tahsil premises | Agrowon

नवीन तहसील आवारातच स्टॅंप उपलब्ध करा
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

मंगळवेढा, जि. सोलापूर : नवीन तहसील आवारात स्टॅंप  उपलब्ध होत नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळेच्या मुलांचे विविध दाखले काढताना हाल होत आहेत. याकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याने याचा त्रास शहर व ग्रामीण भागातील जनतेला होत आहे.

मंगळवेढा, जि. सोलापूर : नवीन तहसील आवारात स्टॅंप  उपलब्ध होत नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळेच्या मुलांचे विविध दाखले काढताना हाल होत आहेत. याकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याने याचा त्रास शहर व ग्रामीण भागातील जनतेला होत आहे.

येथील तहसील कार्यालयाचे दोन वर्षांपूर्वी स्थलांतर करण्यात आले. तेव्हापासून तहसील परिसरात स्टॅंप उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शहर व ग्रामीण भागातून आलेले ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळेच्या विविध दाखल्यांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जुन्या तहसीलजवळ जाऊन स्टॅंप व तिकिटे आणावी लागतात.
एखाद्याला एखादे तिकीट कमी पडल्यास परत तेवढेच अंतर जाऊन तिकीट आणावे लागते. याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे स्टॅम्प उपलब्ध करुन देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

सध्या मागील महिन्यापासून मुलांच्या दाखल्यासाठी अनेक पालक तहसीलमध्ये येतात; परंतु त्यांना स्टॅंप व तिकिटे तहसील आवारात मिळत नाहीत. चार ते पाच किलोमीटर पायपीट करून जादा पैसे देऊन स्टॅंप खरेदी करावे लागतात. त्यामुळे पालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे.
- बाळासाहेब यादव, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, मारापूर

स्टॅंप विक्रीची परवानगी देताना विक्रीचे ठिकाण निश्‍चित केले जाते. तहसील कार्यालयाचा पत्ता बदलल्यानंतर स्टॅंप विक्रेत्यांनी नवीन ठिकाणी मागणी करणे आवश्‍यक आहे. मागणी केल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव पाठवून देणार.
- रमेश पवार, दुय्यम निबंधक

तहसील परिसरात स्टॅंप विक्रेते बसण्याची सक्ती करून जनतेला होणारा त्रास संपवावा. तत्काळ स्टॅंप विक्री नवीन तहसील आवारात सुरू करावी़, अन्यथा  शेतकऱ्यांना घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल.
- अंकुश पडवळे, अध्यक्ष, कृषिक्रांती फार्मर्स क्‍लब, मंगळवेढा

इतर बातम्या
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार...नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि...
दूध दरवाढ निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत...कोल्हापूर: दूध संघांनी गायीच्या दुधास २५ रुपये...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून...जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा...सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा...
आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणारनाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा...
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविलेनाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के...
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र योजना...नागपूर  : वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना...
पीक कर्जवाटपात सातारा जिल्हा अव्वलसातारा  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरलानगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा...नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८...
वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल...वाशीम   ः या मोसमात जिल्ह्यात आतापर्यंत...