मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा प्रश्न गंभीर

मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा प्रश्न गंभीर
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा प्रश्न गंभीर

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. खरीप हंगाम कसाबसा जेमतेम निघाला. परतीच्या पावसाकडून निराशा झाली. खरीप हंगामात जो काही चारा उपलब्ध झाला आहे, तेवढ्यावरच आता येते संपूर्ण वर्ष काढावे लागेल. जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

नाशिक जिल्ह्यात ८ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. ४ तालुक्यांंतील परिस्थिती फारच गंभीर बनली आहे. मालेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. येथे लगेचच चाराटंचाईचा सामना करण्याची वेळ ओढवणार आहे. सिन्नर तालुक्यातही फेब्रुवारीपर्यंतच चारा पुरेल. स्वत:च्या खाण्यापिण्याचा प्रश्न आ वासून उभा असताना जनावरांची वेगळी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. यंदाच्या मोसमातील खरीप हंगामात (२०१८-१९) झालेल्या पेरणीनुसार दुष्काळग्रस्त आठ तालुक्यांमध्ये ८ लाख ६२ हजार ३२७ मेट्रिक टन इतका चारा उपलब्ध होणार आहे.

दरमहा चाऱ्याची गरज

आठ तालुक्यांतील मोठ्या जनावरांना प्रतिदिन ४२७७.१४२ मेट्रिक टन, तर प्रतिमहिना १ लाख २८,३१४.३ मेट्रिक टन इतक्या चाऱ्याची आवश्यकता आहे. छोट्या जनावरांना प्रतिदिन १८९२.०२८ मेट्रिक टन, तर प्रतिमहा ५६ हजार ७६०.८४ मेट्रिक टन इतक्या चाऱ्याची आवश्यकता आहे. एकूण सर्व जनावरांना मिळून दरमहा चारा १ लाख ८५ हजार ०७५.१ मेट्रिक टन इतक्या चाऱ्याची आवश्यकता आहे.

आठ तालुक्यातील पशुधन संख्या

गाई व म्हशी सात लाख १२ हजार ८५७
शेळ्या/मेंढ्या सहा लाख ३० हजार ६७६
एकूण पशुधन  १३ लाख ४३ हजार ५३३

तालुकानिहाय चारास्थिती (मेट्रिक टन)

सटाणा ७० हजार ३९३
मालेगाव  ९० हजार८३४
सिन्नर  एक लाख २३ हजार २९१
देवळा  ८९ हजार २६२
चांदवड एक लाख तीन हजार ४३०
इगतपुरी दोन लाख १८ हजार ५१७
नाशिक ७७ हजार १४०

तालुका - चारा पुरण्याचा कालावधी

मालेगाव  डिसेंबर २०१८
सिन्नर  फेब्रुवारी २०१९
सटाणा  जुन २०१९
नांदगाव  मार्च २०१९
देवळा  मे २०१९
चांदवड   मे २०१९
इगतपुरी ऑक्टोबर २०१९
नाशिक  मे २०१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com