सिंधुदुर्ग झोडपले; मालवणला ४९१ मिलिमीटर पाऊस !

सिंधुदुर्ग झोडपले; मालवणला ४९१ मिलिमीटर पाऊस !
सिंधुदुर्ग झोडपले; मालवणला ४९१ मिलिमीटर पाऊस !

कणकवली, जि. सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मॉन्सूनचे दमदार आगमन झाले असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 174.87 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिका पाऊस मालवण किनारपट्टीवर 491 मिमी इतका झाला आहे. शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून, किनारपट्टीत दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. पुढील तीन दिवस अतिदक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरवात झाली. आतापर्यंत सरासरी 297.5 मिमी इतका दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 3600 मिमी पाऊस कोसळतो. यंदा मात्र जूनच्या पहिल्याच आठवड्यात कमाल पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. किनार पट्टीत दमदार पाऊस कोसळत असून समुद्र खवळलेला आहे. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर कमी असला तरी सकाळपासून पावसाची रिपरिप कायम आहे. नदीनाल्यांना पूरसदृश्‍य पाणी आले आहे. काही भागात गोड्या पाण्यातील चढणीचे मासे मारण्यासाठी खवय्याची लगबग सुरू झाली आहे. शनिवारी (ता. 9) सकाळी आठ वाजेपर्यंत आठही तालुक्‍यांत झालेला पाऊस (मिमी) ः दोडामार्ग -72, सावंतवाडी - 131,वेंगुर्ला - 266, कुडाळ - 175, मालवण- 491, कणकवली - 35, देवगड - 190, वैभववाडी - 39.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com