agriculture news in marathi, Manage horticulture in drought situation | Agrowon

दुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी न घेतल्यास फळबागेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुष्काळी स्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन करताना सूक्ष्म सिंचन, मटका सिंचन पद्धत, पाॅलिथिन आच्छादन अशा विविध पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालकांनी केले. 

पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी न घेतल्यास फळबागेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुष्काळी स्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन करताना सूक्ष्म सिंचन, मटका सिंचन पद्धत, पाॅलिथिन आच्छादन अशा विविध पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालकांनी केले. 

 राज्याचे ढोबळमानाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे चार विभाग पडतात. यामध्ये कोकण विभागात आंबा, काजू, नारळ, चिकू, सुपारी, पश्चिम महाराष्ट्रात केळी, पपई, पेरू, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, लिंबू, मराठवाडा विभागात मोसंबी, लिंबू , डाळिंब, आंबा, सीताफळ विदर्भात संत्रा, मोसबी, लिंबू, आंबा, सीताफळ, केळी, बोर, डाळिंब, पेरू, आवळा, पपई फळपिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. यंदा कमी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामाही वाया जाण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न गंभीर बनणार आहे. यामुळे शेतीवर परिणाम झाला असून अशा दुष्काळी परिस्थितीत फळपिके जगविणे मोठे आव्हान उभे राहणार आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्तापासून उपाययोजना करण्याची गरज आहे. 

उन्हाळ्यात किंवा दुष्काळ सदृश काळात फळबागा वाचविण्यासाठी सूक्ष्म सिंचन मुख्यत ठिबक पद्धतीचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा ५० ते ६० टक्के पाणी बचत होते. शिवाय दर्जेदार व अधिक उत्पादन मिळते. तसेच मजुरांवरील व खतावरील खर्च कमी होतो. यामुळे शेतकरी बंधूंनी सूक्ष्म सिंचनपद्धतीचा वापर करावा व कमीतकमी पाण्यामध्ये आपल्या फळबागा टिकवाव्यात. याशिवाय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अल्प, अत्यल्प अनुसूचित जाती - जमाती या शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५५ टक्के अनुदान व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येते. 

अशा करा उपाययोजना
मटका सिंचन पद्धत, आच्छादनाचा वापर, बाष्परोधकाचा वापर, झाडाची छाटणी, झाडाचे छत्र व्यवस्थापन, झाडांवरील पानोळा कमी करावा (डिव्होलिएशन), जमिनीत पाणी धरून ठेवणाऱ्या घटकांचा वापर करावा, नवीन झाडाकरिता सावली करावी, शेततळ्यातील पाण्याचा योग्य पद्धतीने वापर अशा विविध पद्धतींचा अवलंब करून फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी केले.

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...