agriculture news in marathi, Management can increase productivity by adding chilli | Agrowon

व्यवस्थापनाद्वारे मिरची उत्पादनवाढ शक्‍य
टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

नंदुरबार : मिरची पीक नाजूक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन अगदी रोपावस्थेपासून करणे आवश्‍यक आहे. या अवस्थेत रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. तो न रोखल्यास विषाणूजन्य रोगांचे आक्रमण पिकावर होते, असे मत तज्ज्ञांनी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

नंदुरबार : मिरची पीक नाजूक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन अगदी रोपावस्थेपासून करणे आवश्‍यक आहे. या अवस्थेत रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. तो न रोखल्यास विषाणूजन्य रोगांचे आक्रमण पिकावर होते, असे मत तज्ज्ञांनी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

कोळदा (ता. जि. नंदुरबार) येथे मिरची पीक प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवारी (ता. ६) झाला. त्यात रायपूर (छत्तीसगड) येथील तज्ज्ञ नवीन पडियार, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पटेल, मिरची उत्पादक प्रवीण चावला, योगेश विठ्ठल पटेल (पिंपळोद, जि. तापी, गुजरात), जगानन बारबुद्धे यांनी आपले विचार मांडले. केव्हीकेचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रगतिशील शेतकरी चावला म्हणाले, ‘‘फर्टिगेशन अतिशय महत्त्वाचे आहे. त्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. डीएपीचा अधिक वापर टाळावा.``

‘‘मिरची पिकाचे व्यवस्थापन लागडवडीपासून व्यवस्थित करायला हवे. फवारण्यांचे वेळापत्रक पाळले पाहिजे. निर्यातक्षम मिरचीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे योगेश पटेल यांनी सांगितले. पडियार यांनी मिरची पिकासंबंधीचे नवतंत्रज्ञान, कमी खर्चातील खत व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.

प्रास्ताविक दहातोंडे यांनी केले. संचलन विषयतज्ज्ञ आर. एम. पाटील यांनी केले. कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ पी. सी. कुंदे, जयंत उत्तरवार, यु. डी. पाटील, आर. आर. भावसार, गीता कदम, राहुल नवले आदींनी सहकार्य केले.

इतर बातम्या
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
कडधान्याची कमी दरात सर्रास खरेदीजळगाव ः जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, पाचोरा,...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
जळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊसजळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...