स्वच्छता, योग्य व्यवस्थापनातून टाळा पक्ष्यांतील काॅक्सीडीअाॅसीस

कॉक्सीडीअाॅसीस अाजार टाळण्यासाठी पक्षांच्या शेडमध्ये स्वच्छता राखावी.
कॉक्सीडीअाॅसीस अाजार टाळण्यासाठी पक्षांच्या शेडमध्ये स्वच्छता राखावी.

शेडमधील अस्वच्छता अाणि अनियोजित व्यवस्थापनामुळे पक्ष्यांमध्ये कॉक्सीडीअाॅसीस अाजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अाजार टाळण्यासाठी पक्ष्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांची योग्य ती काळजी घ्यावी, शेडमध्ये स्वच्छता राखावी. त्यामुळे पक्ष्यांच्या वाढीस व उत्पादनास योग्य चालना मिळते. भारतामध्ये अंडी उत्पादनवाढीचा दर सरासरी ६ टक्के आणि ब्रॉयलर उत्पादनाचा दर १२ टक्के आहे. अंडी उत्पादनामध्ये चीन जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. तर, भारत तिसऱ्या क्रमांकावर असून, ब्रॉयलर मांस उत्पादनात भारत ६ व्या क्रमांकावर आहे. ब्राॅयलर पक्ष्यांमध्ये विविध प्रकारचे रोग अाढळून येतात. यापैकी काॅक्सीडीअाॅसीस हा ब्राॅयलर पक्ष्यांमध्ये आढळून येणारा एक सामान्य परजीवी रोग आहे, ज्यामध्ये आतड्याचा दाह आणि रक्त.िम.िश्रत अतिसार दिसून येतो. हा रोग काॅक्सीडिया नावाच्या सूक्ष्म परजीवीमुळे होतो. रोगाचा प्रसार हा रोग साधारणपणे २० ते ३५ दिवसांच्या वयोगटातील पक्ष्यांमध्ये आढळून येतो. कोक्सीडिया परजीवीची अंडी खाद्यासोबत पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये जाऊन त्याचे जीवनचक्र पूर्ण करतात. त्यामुळे हजारो नवीन परजीवी तयार होतात. निर्माण झालेले परजीवी लैंगिक आणि अलैंगिक प्रजननाद्वारे अंडी निर्माण करतात; पुढे ही अंडी विष्ठेद्वारे बाहेर पडतात. दूषित पाणी आणि विष्ठेद्वारे, परिसरातील कचरा, धूळ, कीटक, माणसांचे कपडे, चपला आणि बूट इ. द्वारे अंड्याचा प्रसार होतो. खाद्य आणि पाण्यासोबत इतर पक्ष्यांना कॉक्सीडीअाॅसीस रोगाचा प्रादुर्भाव होतो. लक्षणे

  • या रोगामुळे पक्ष्यांमध्ये रक्तमि.िश्रत विष्ठा, विखुरलेले पंख, मान टाकणे, आहार कमी होणे, रक्ताची कमतरता, वजन वाढीचा दर कमी होणे, पक्ष्यांच्या डोक्याचा आकार कमी होताो इत्यादी लक्षणे दिसून येतात अाणि पक्ष्यांची मरतूक ५० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
  • छोट्या आतड्यातील काॅक्सीडीअाॅसीसमध्ये मरतूक कमी असतो, जो १० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामध्ये उत्पादनात होणारी घट, पक्ष्यांची मरतूक आणि रोगावर होणारा उपचाराचा खर्च यांचा समावेश आहे.
  • इतर लक्षणे

  • पक्षी अशक्त व नीरस दिसतात.
  • पक्षी एकत्र घोळक्याने राहतात.
  • डोक्यावरचा तुरा व त्वचेचा रंग फिकट गुलाबी होतो.
  • आहार, वजन व वजन वाढीचा दर कमी होतो.
  • अतिसार. ही सर्व लक्षणे इतर आजारांप्रमाणेच अाहेत, त्यामुळे काॅक्सीडीअाॅसीस अाजाराचे निदान पशुवैद्यकाकडूनच निश्चित करावे.
  • प्रादुर्भावाची व प्रसाराची कारणे

  • व्यवस्थापन हे मुख्यत्वे शेडमधील स्वच्छतेशी संबंधित आहे. शेडमधील ओला झालेला गव्हाचा/तांदळाचा कोंडा न बदलल्यामुळे काॅक्सीडीयाच्या अंड्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते आणि त्यामुळे परजीवीचे जीवनचक्र पूर्ण होऊन रोग होण्याची शक्यता बळावते.
  • अस्वच्छ किंवा खराब झालेल्या खाद्याच्या आणि पाण्याच्या भांड्यामुळेसुद्धा काॅक्सीडीअाॅसीसचा संसर्ग अाणि प्रसार होतो.
  • शेडमधील पक्ष्यांच्या जास्त संख्येमुळेही या रोगाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे पक्ष्यांची घनता नियंत्रणात ठेवावी.
  • आहारातील ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता हे पक्ष्यांना काॅक्सीडिअाॅसीसचा प्रादुर्भाव होण्याचे महत्त्वपूर्ण कारण आहे.
  • रोगाचे निदान

  • पक्ष्यांमध्ये दिसून येणाऱ्या विविध लक्षणावरून.
  • मृत पक्ष्यांमध्ये शवविच्छेदन चाचणीमध्ये लहान आतड्यांमध्ये दाह व रक्तस्राव दिसून आल्यास.
  • विष्ठेच्या तपासणीमध्ये कोक्सीडियाची अंडी आढळून आल्यास.
  • आतड्यांमधील संक्रमित भागांची सूक्ष्मदर्शकाद्वारे चाचणी.
  • उपचार आणि नियंत्रण

  • शेडच्या प्रवेशद्वारामध्ये चुन्याची पावडर अथवा फॉर्म्याल्डीहाईड युक्त पाण्याचा वापर करावा.
  • पक्ष्यांवर येणारा अनावश्यक ताण टाळावा.
  • शेडमधील तापमान अाणि आर्द्रतेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे.
  • शेडमधील अोला झालेला धान्याचा कोंडा अाणि कचऱ्याची योग्य वेळी विल्हेवाट लावावी.
  • आजारी पक्षी वेगळे करून पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.
  • अस्वच्छ आणि खराब पाण्याच्या भांड्याचा वापर करणे टाळावे.
  • कोक्सीडिया या परजीवीची अंडी दमट अाणि अोलसर हवामानात पोसली जातात. त्यामुळे शेडमध्ये सतत अोलसर वातावरण राहू नये, यासाठी प्रयत्न करावेत.
  • पक्ष्यांचे खाद्य अाणि पिण्याचे पाणी स्वच्छ असावे. शेडमधील पक्ष्यांची विष्ठा वेळोवेळी स्वच्छ करावी. त्यामुळे रोगाचा प्रसार वेगाने होऊ शकतो.
  • एका कोंबडीसाठी साधारणपणे चार चौरस फूट जागा उपलब्ध असावी.
  • विष्ठेमध्ये रक्त, आहार कमी होणे, वजनवाढीचा दर कमी होणे यापैकी कोणतेही लक्षण आढळून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाशी संपर्क साधावा.
  • डॉ. नितीन कुरकुरे, ८९५०७२१४२२ (विकृतिशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com