प्रतिबंधात्मक उपचारांनी टाळा जनावरांतील उष्माघात

कडक उन्हात जनावरे सावलीत राहतील याची काळजी घ्यावी.
कडक उन्हात जनावरे सावलीत राहतील याची काळजी घ्यावी.

 जास्त तापमानामुळे जनावरांना उष्माघात होण्याची शक्यता असते. म्हशी, संकरित गायींमध्ये उष्माघाताचे प्रमाण जास्त असते. उष्माघातामुळे जनावरांची उत्पादकता कमी होते. बऱ्याचदा जनावर दगावू शकते. जास्त वयस्क व कमी वयाच्या जनावरात उष्णता सहन करण्याची क्षमता कमी असते, अशी जनावरे उन्हाळ्यात उष्माघातास जास्त बळी पडतात. उष्माघाताची कारणे

  • उन्हाळ्यातील जास्त तापमानामुळे
  • उन्हाळ्यात वातावरणात भरपूर आर्द्रता असणे
  • जनावरांचा गोठा कोंदट असणे.
  • उन्हाच्या वेळेस जनावरांना चरण्यासाठी सोडणे.
  • उन्हाळ्यात जनावरांची लांब वाहतूक करणे.
  • पिण्याच्या पाण्याची कमरता असणे.
  •  जनावरांसाठी दिवसा सावलीची सोय नसणे.
  •  लठ्ठ जनावरे, अंगावर भरपूर केस किंवा लोकर असणाऱ्या जनावरांना उष्माघाताचा त्रास जास्त होतो.
  • लक्षणे

  • शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंश फॅरनहाइटपर्यंत वाढते.
  • जनावराच्या श्वसनाचा वेग वाढतो.
  • हृदयाचे ठोके वाढतात.
  • जनावर जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करते, लाळ गाळते.
  • नाकातून स्राव येतो.
  • जनावराला भरपूर तहान लागते
  • जनावर अस्वस्थ होते. शरीराचा तोल सांभाळता येत नाही.
  • चालताना अडखळते व कोसळते.
  • फिट्स (झटके) येणे.
  • जनावर बेशुद्ध पडून दगावते.
  • उपचार

  • जनावरांचा गोठा हवेशीर असावा.
  • जनावरांना हवेशीर ठिकाणी बांधावे किंवा गोठ्यामध्ये पंख्याची व्यवस्था करावी, जेणेकरून हवा खेळती राहील.
  • जनावराचे अंग थंड पाण्याने ओले करावे, जेणेकरून शरीराचे तापमान कमी होईल.
  • पिण्यासाठी भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे.
  • जनावराच्या गुदद्वारात बर्फ किंवा थंड पाण्याचा एनिमा करावा, यासाठी पशुवैद्याकाची मदत घ्यावी.
  • जनावराच्या डोक्यावर बर्फाने शेकावे.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने थंड ग्लुकोज, सलाईन द्यावे.
  • आजारी जनावरास सावलीत बांधावे.
  • प्रतिबंध

  • कडक उन्हात जनावरे चारण्यास सोडू नयेत.
  • उन्हाच्या वेळी जनावरांची लांब वाहतूक करू नये. जनावरांची वाहतूक सकाळी किंवा सायंकाळी करावी.
  • अंगावर भरपूर केस, लोकर असणाऱ्या जनावरांना अंगावरील केस काढून टाकावेत.
  • संपर्क ः डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६ (मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com