गाभण गाईंचे योग्य व्यवस्थापन ठेवा...

 गाय व्याल्यानंतर एक तासाच्या आत वासराला चीक पाजावा.
गाय व्याल्यानंतर एक तासाच्या आत वासराला चीक पाजावा.

गाभण गाईची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. गर्भाची चांगली वाढ होण्यासाठी संतुलित प्रमाणात चारा, खुराक द्यावा. व्यायलेल्या गाईची व्यवस्था वेगळ्या गोठ्यात करावी. वासराची वाढ गाईच्या पोटात शेवटच्या दोन महिन्यांत ६० ते ७० टक्के होते. वासराच्या चांगल्या वाढीसाठी गाईला संतुलिक चारा आणि खुराक द्यावा.   गाभण गाईसाठी पुरेशा प्रमाणात हिरवा व सुका चाऱ्याची व्यवस्था करावी. शरीरपोषणासाठी १.५ किलो खुराक आणि गर्भवाढीसाठी १ किलो खुराक सात महिऩ्यांपर्यंत द्यावा. सातव्या महिन्यापासून दोन किलो गाभण खुराक द्यावा. दररोज ५० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे. सातव्या महिन्यानंतर बायपास फॅट ५० ग्रॅम द्यावे. पशितज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जंतनिर्मूलन व लसीकरण करावे. गर्भाची चांगली वाढ होण्यासाठी संतुलित प्रमाणात चारा, खुराक द्यावा. व्यायलेल्या गाईची काळजी ः

  • व्यायलेल्या गाईची व्यवस्था वेगळ्या गोठ्यात करावी. गाईला कोमट पाणी द्यावे. गाईचा पाठीमागचा भाग कोमट पाण्याने धुवून कोरडा करावा.
  • गूळ व बाजरी एकत्रित चांगल्या प्रकारे शिजवून चार दिवस गाईला खाण्यास द्यावी. गाईला बायपास फॅट १०० ग्रॅम प्रतिदिवस व्याल्यापासून ९० दिवस द्यावे.
  • व्यायल्यानंतर गाईला कॅल्शिअमची कमतरता भासू शकते. त्याप्रमाणे योग्य मात्रा द्यावी. गाई व्याल्यानंतर पहिले दोन दिवस कासेतील पूर्ण चीक (खरवस) न काढता २५ टक्के चीक कासेत ठेवावा.
  • गाईच्या खुराकामध्ये शतावरी, अश्वगंधा या औषधी वनस्पतींचा उपयोग करावा.
  • गाईचा वार एक तास ते आठ तासांमध्ये पूर्णपणे पडणे गरजेचा आहे. जेवढा लवकर वार पडेल ती तेवढी सुदृढ आहे असे समजावे. गाय कुचंबल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकाचा तातडीने सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात.
  • व्याल्यानंतर गाईची वार ६ ते १२ तासांत पडते. व्याल्यानंतर कास स्वच्छ धुऊन चीक पिळून वासरास द्यावा. चीक पिळण्यास वार पाडण्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. उलट चीक काढल्यामुळे व वासरू सडाला लागल्यामुळे गाईच्या शरीरात निर्माण होणाऱ्या अंतःस्त्रावामुळे वार सुटण्यास मदत होते.
  • व्याल्यानंतर गाईस विश्रांती घेऊ द्यावी. तिला या वेळी ऊर्जेची आवश्यकता असते, म्हणून शिजवलेली बाजरी व गूळ द्यावा. काही पशूपालक हळीव, खोबरे याचे मिश्रण देतात.
  • गाईची कंबर सोसवेल अशा गरम पाण्याने शेकावी.
  • वासराच्या वजनाची नोंद करावी. वासरास टॅग मारावा.
  • गाय आटवणे आणि भाकड गाईचे व्यवस्थापन ः

  • गाय व्याल्यांनतर २ ते ३ महिन्यांनी माजावर येते. पहिल्या माज सोडून दुसऱ्या माजावर गाईस रेतन करावे. २) गाई भरल्यानंतर २१ दिवसांनी गाय माजावर आली नाही तर गाभण आहे असे समजावे. साधारणपणे ६० दिवसांनी तिची तपासणी करावी.
  • गाय विण्याच्या दोन महिने अगोदर आटवावी. त्यासाठी योग्यप्रकारे नियोजन करावे.
  • गाय आटवल्यानंतर गाईला वेगळे करावे. शरीरपोषणासाठी एक किलो आणि गर्भाच्या वाढीसाठी दोन किलो खुराक नियमीतपणे द्यावा. गाय विण्याच्या एक महिना आधी खुराक तीन किलो करावा.
  • संतुलित चाऱ्याबरोबरीने गाईला खनिज मिश्रण देणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणपणे ५० ग्रॅम खनिज मिश्रण आणि ५० ग्रॅम बायपास फॅट द्यावे.
  • नवजात वासराची काळजी ः

  • वासराची वाढ गाईच्या पोटात शेवटच्या दोन महिन्यांत ६० ते ७० टक्के होत असते. वासराच्या चांगल्या वाढीसाठी गाईला संतुलिक खुराक द्यावा.
  • गायीला दोन महिने आधी गाभण खुराक दोन किलो चालू करावा, तो वाढवत तीन किलोपर्यंत गायी व्याल्यापर्यंत करावा.
  • गाय व्याल्यानंतर वासरास गाईसमोर ठेवावे. गाय चाटून त्याला स्वच्छ करील. गाईच्या जिभेच्या खरबरीतपणामुळे वासराच्या रक्ताभिसरणास मदत होते. वासराची नाळ बांधावी. काही वेळा विताना गाईला फार त्रास झाला असेल अगर गाईला अषक्तपणा आला असेल, तर गाय वासरास चाटत नाही. या वेळी आपण कोरड्या फडक्याने वासरास स्वच्छ करावे. वासराच्या नाका-तोंडातील चिकट स्त्राव काढून टाकावा. खुरी योग्य प्द्धतीने काढाव्यात. वासरू जन्माच्या वेळी उलटे आले असल्यास, गर्भाशयातील पाणी नाका-तोंडात जाऊन गुदमरण्याचा संभव असतो. तेव्हा वासरू उलटे धरून नाका-तोंडातील पाणी काढून टाकावे.
  • एक तासाच्या आत वासराला चीक पाजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसातून तीन वेळा सर्वसाधारणपणे २ ते २.५ लिटर चीक पाजावा. वासराच्या वजनाच्या १० टक्के चीक/दूध पुढील महिनाभर पाजावे. एक महिन्यानंतर वजनाच्या २० टक्के दुध पाजावे व वासरास ओला/सुका चारा देण्यास सुरवात करावी. वासरास तीन महिन्यानंतर काफ स्टार्टर ५० ग्रॅम पासून देण्यास सुरुवात करावी. वाढवत ते ५०० ग्रॅम करावे काफ स्टार्टर वयाच्या सहा महिन्यांपर्यंत द्यावे.
  • एक महिन्यानंतर जंतनाशक पाजावे. पुढे ३ महिन्यांनी, ६ महिन्यानी जंतनाशक पाजावे.
  • वासरास कोवळ्या उन्हात सोडावे, गोचिडापासून संरक्षण करावे. ६ महिने ते १२ महिने वयातील वासरे ः  
  • वासराचे नामकरण करून नंबर द्यावा. वासरांचा वाढीचा वेग सुमारे ४०० ते ५०० ग्रॅम प्रतिदिवस असावा.
  • सहा महिने वयानंतर वासरांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. वासरांच्या गोठ्यात खनिज द्रव्यांच्या विटा बांधाव्यात.
  • वासराच्या वजनानुसार त्याला योग्य वाढीसाठी चारा व पशूखाद्य द्यावे.
  • लसीकरण व जंतनिर्मुलन दर तीन महिन्यांनी करुन घ्यावे.
  • १२ महिने ते २ वर्षे वयातील वासरे ः

  • लसीकरण व जंतनिर्मूलन योग्य प्रकारे करावेत. एकाच प्रकारचे जंतनाशक प्रत्येक वेळी वापरू नये.
  • नर व मादी वासरांचे वेगळे व्यवस्थापन करावे. शरीरवाढीसाठी योग्य पशूखाद्य द्यावे जेणे करुन योग्य शारीरिक व लैंगिक वाढ होईल.
  • दोन वर्षात कालवडीचे वजन २५६ किलो झाले पाहिजे. दोन वर्षांत कालवड माजावर आली पाहिजे.
  • चारा नियोजन करताना एकदल व द्विदल चाऱ्याचा वापर करावा.
  • संपर्क ः डॉ.सोमनाथ माने ः ९८८१७२१०२२ ( पशूविज्ञान व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com