agriculture news in marathi, Manchar Market Committee issue | Agrowon

मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूट
गणेश कोरे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीत कटतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सध्या पालेभाज्यांचे दर वधारलेले असताना शेतकऱ्यांच्या हाेणाऱ्या लुटीकडे बाजार समिती प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समाेर येत आहे. शेकड्याला १० जुड्यांची कटती हाेत असल्याने शेतकऱ्यांना लाखाे रुपयांच्या नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे.

पुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीत कटतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सध्या पालेभाज्यांचे दर वधारलेले असताना शेतकऱ्यांच्या हाेणाऱ्या लुटीकडे बाजार समिती प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समाेर येत आहे. शेकड्याला १० जुड्यांची कटती हाेत असल्याने शेतकऱ्यांना लाखाे रुपयांच्या नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे.
याबाबात दत्तात्रय खंडेराव चव्हाण (रा. अवसरी बुद्रुक) यांनी बाजार समितीकडे तक्रार केली आहे. चव्हाण म्हणाले, ‘‘मी बाजार समितीमध्ये दाेन वेळा एक-एक हजार जुड्या विक्रीसाठी नेल्या हाेत्या. व्यापाऱ्यांनी साैदा झाल्यावर शंभराला १० जुड्या हिशाेबाला कमी धरल्या.

याबाबत मी व्यापाऱ्याला हिशाेबपट्टीवर सर्व व्यवहार घ्यायला लावला, पण त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे मला शेकड्याला २६०० रुपये दर मिळाला हाेता. दाेन हजार जुड्यांमागे २०० जुड्यांची कटती केल्याने मला सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत मी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली. याबाबत सचिवांनी मला हिशाेबपट्टीसह चाैकशीसाठी बाेलावले असून, कटती बंद करण्याचे आश्‍वासन दिले.

याबाबत बाजार समितीचे सचिव गावडे म्हणाले, ‘‘बाजार समितीमध्ये काेणत्याही प्रकारचा कडता घेतला जात नाही. तसेच शेतकऱ्यांच्या काेणत्याही लेखी तक्रारी आलेल्या नाहीत. शेतकरी आणि व्यापारी परस्पर संमतीने घेत असल्यास माहिती नाही.

मात्र, कडत्याबाबत तक्रारी आल्यातर आम्ही त्या जागेवरच साेडवताे. सध्या बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) मेथीच्या सुमारे १२ हजार जुड्यांची आवक हाेऊन ६०१ ते १७५० रुपये शेकड्याला दर मिळाला आहे. तर काेथिंबीरीची ९ हजार ३२१ आवक हाेऊन, ४०१ ते ३ हजार ४०१ रुपये दर मिळाला आहे’’.

इतर ताज्या घडामोडी
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...
राज्य सरकारने मेस्मा कायदा मागे घेतलामुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविकांची नियुक्ती...
पीककर्ज वाटप उद्दिष्टाला बॅंकांकडून...सातारा : जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी रब्बी...
तीन जिल्ह्यांत एक लाख क्‍विंटल तूर... औरंगाबाद  : खरेदी केंद्रे सुरू होऊन तूर...
नांदेड विभागातील बत्तीस कारखान्यांकडून... नांदेड  ः येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
बुलडाण्यातील २९ लघू प्रकल्प कोरडे बुलडाणा : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत...
सोलापूर जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी सोलापूर  : राज्य शासनाने पाणीटंचाईवर...
पूर्व विदर्भात धानाची उत्पादकता हेक्टरी... नागपूर  ः कमी पाऊस त्यासोबतच हंगामात...
जळगाव जिल्ह्यात गव्हाची आवक वाढतेय जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
सातारा जिल्ह्यात ऊस पाचट व्यवस्थापनाकडे... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात गोदामे उपलब्ध नसल्याने... जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी रखडली असून...
सूक्ष्म सिंचनाद्वारे खतांचा कार्यक्षम...फर्टिगेशनमुळे खते आणि पाणी कार्यक्षमपणे पिकांच्या...
पुणे जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०३ लाख... पुणे  ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा...
पुणे जिल्ह्यात गव्हाची काढणी सुरूपुणे  ः दिवसेंदिवसे शेतीकामांसाठी मजुरांचा...
ढगाळ हवामानाचा काजू उत्पादनाला फटकासिंधुदुर्ग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस...
कृषी विभागाच्या योजनांना गती द्या :...मुंबई : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या कामांना...