दक्षिण अाफ्रिकेचा आंबा पुण्यात दाखल

आंबा आवक
आंबा आवक
पुणे : काेकणातील आंबा हंगामाचे वेध लागले असतानाच पुणे बाजार समितीमध्ये दक्षिण अाफ्रिकेतून आंब्याची आवक सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यापासून या आंब्याची आवक हाेत असून, मागील आठवड्यात १० बॉक्सची आवक झाली हाेती. रविवारी (ता. २४) ५ बॉक्सची आवक झाल्याचे प्रभू नवलदे यांनी सांगितले. 
दक्षिण अाफ्रिकेतून प्रथमच आंब्याची आवक झाली असून, एका बॉक्समध्ये ६ ते ८ नग असतात. हा आंबा कैरीसारखा हिरवा असून, एका बॉक्सला साधारण १५०० रुपये दर मिळत असल्याचे नवलदे यांनी सांगितले.
एका फळाचे वजन ५०० ते ८०० ग्रॅम एवढे आहे. शहरातील फळ विक्रेत्यांकडून या आंब्याची खरेदी हाेत असून, पुढे किरकाेळ ग्राहकांसाठी विक्री केली जाते. पहिल्यादांच आवक झाल्याने चवीबाबत अद्याप प्रतिक्रिया न आल्याने हा आंबा ग्राहकांच्या पसंतीला उतरलेला दिसत नसल्याचेही नवलदे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com