agriculture news in marathi, mango export through sea route, mumbai, maharshtra | Agrowon

साडेचौदा टन केशर, बदामी आंबा समुद्रामार्गे इंग्लंडला निर्यात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

बॉम्बे फ्रूट्स अॅण्ड व्हेजिटेबल्स इम्पोर्ट-एक्स्पोर्ट प्रा.लि. या कंपनीच्या बॉम्बे एक्स्पोर्ट्स या ब्रँडखाली हे आंबे निर्यात करण्यात आले आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरवात करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास सर्वच निर्यातदार व्यापाऱ्यांसाठी लांब पल्ल्याच्या जलवाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. अपेडा आणि राज्य पणन मंडळाचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे हे शक्य झाले.
- प्रीतेश शेजवळ, आंबा निर्यातदार, मुंबई.

मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे टिकवणक्षमता वाढवता येणाऱ्या आधुनिक तंत्राच्या साह्याने मुंबईहून पहिल्यांदाच जलवाहतुकीद्वारे साडेचौदा टन केशर आणि बदाम आंबा इंग्लंडला निर्यात करण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त हवाई वाहतुकीमार्गे आंबा निर्यात केला जात होता. या नव्या तंत्रामुळे निर्यातदारांना दीर्घ अंतरावरील जलवाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. 

कंट्रोल अॅटमॉस्फियर रिफर टेम्प्रेचर या वातावरण नियंत्रित करणाऱ्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून कंटेनरमधील कार्बनडाय ऑक्साईड आणि ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित केले जाते. त्यामुळे आंबा पक्व होण्याचा काळ नियंत्रित होऊन फळाची टिकवणक्षमता वाढवली जाते. आंबा काढणीनंतर खाण्यायोग्य असेपर्यंत पंधरा दिवसांचा काळ गृहीत धरला जातो. हवाई वाहतुकीमार्गे पाठवला जाणारा आंबा लवकर पोचतो. त्यासाठी या प्रक्रियेची आवश्यकता भासत नाही. 

मुंबईहून इंग्लंडला जल वाहतुकीमार्गे आंबा पोचण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी जातो, अशा लांब पल्ल्याच्या, दीर्घकालीन वाहतुकीचा विचार करून जहाजामार्गे आंबा पाठवायचा असेल तर, त्यासाठी या आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. जेणेकरून आंबा पोचल्यानंतर ते फळ खाण्यायोग्य अवस्थेत ग्राहकांपर्यंत पोचवता येते. या सगळ्या प्रक्रियेत आंब्याच्या दर्जावर कोणताही परिणाम होत नाही. फळाची चव, दर्जा कायम राहतो. या आधुनिक तंत्राचा वापर करून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून पहिल्यांदाच आंब्याचा कंटेनर रवाना झाला.

सध्या गुजरातचा केशर आणि आंध्र प्रदेशचा बदामी आंबा पाठवण्यात आला आहे. दोन्ही मिळून सुमारे साडेचौदा टन आंबा इंग्लंडला निर्यात करण्यात आला आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरवात करण्यात आली आहे. आंब्याच्या हवाई वाहतुकीला मोठा खर्च येतो. अनेकदा आंब्यापेक्षा वाहतुकीचाच खर्च अधिक होत असल्याने आंब्याचे दरही वाढतात. परिणामी ग्राहक इतर देशातील आंब्यांकडे वळू शकतात. 

तुलनेत जलवाहतुकीचा खर्च कमी असतो. आंब्याचे दरही मर्यादित राहू शकतात. त्यामुळे भारतीय आंब्याचा ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना निर्यातीसाठी हवाई वाहतुकीसोबतच जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मॉक्सलाइन शिपिंग कंपनीच्या मुंबई ते इंग्लंड जल वाहतूक सेवेच्या माध्यमातून आंब्याचा हा पहिला कंटेनर इंग्लंडला येत्या दोन दिवसांत रवाना होणार आहे. पुढील २१ दिवसांत हे जहाज इंग्लंडला पोचेल. 
 

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...