agriculture news in marathi, Mango Growers aim to Export | Agrowon

आंबा उत्पादकांचा निर्यातीचा संकल्प
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

जालना : केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा आंबा निर्यातीचा संकल्प केला आहे. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या टेंभुर्णी येथील गजेंद्र महाराज मठावर बुधवारी (ता. २७) झालेल्या कार्यक्रमात गटशेतीतील शेतकऱ्यांनी हा संकल्प केला आहे.

जालना : केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा आंबा निर्यातीचा संकल्प केला आहे. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या टेंभुर्णी येथील गजेंद्र महाराज मठावर बुधवारी (ता. २७) झालेल्या कार्यक्रमात गटशेतीतील शेतकऱ्यांनी हा संकल्प केला आहे.

मराठवाड्यातील केशर आंब्याची गोडी आणि गंध सर्वांनाच भूरळ घालणारी आहे. ॲग्रोव्हीजन गटशेती संघाच्या बैठकीत यंदा काय करावं, फळबाग आणि पिकांच्या दृष्टीने बाजारातील संधी नेमक्‍या कोणत्या हा विषय पुढे आला. या बैठकीला उपस्थित असलेल्या जाफ्राबाद तालुक्‍यातील जवळपास 39 केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा मोहर येण्याला थोडा अवधी असल्याने यंदा सर्वच आंबा उत्पादकांनी सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादीत करून त्याची निर्यात करण्याची संधी असल्याचा विचार मांडला. त्यावर एकमत होउन येत्या ३१ डिसेंबरपूर्वी अपेडाकडे सर्व शेतकऱ्यांची नोंदणी व लागलीच सेंद्रिय पद्‌धतीने आंबा उत्पादनासाठी निविष्ठांची तयारी, आंबा बागांचा विमा उतरविण्याचा निश्चय करण्यात आला.

केशर आंब्याची निर्यात करू इच्छिणाऱ्या निर्यातदारांशी यासाठी संपर्क साधण्याचे कामही लागलीच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ॲग्रोव्हीजन गटशेती संघाच्या वतीने देण्यात आली. संघाचे प्रमुख संजय मोरे पाटील यांनी शेतकऱ्यांना पीकविमा भरताना व तो मिळविताना येणाऱ्या अनंत अडचणी, निर्यातीचे महत्त्व, त्यासाठी आवश्‍यक बाबी व अपेडाकडे नोंदणी आदी बाबींवर विस्तृत मार्गदर्शन केले.

जलसंधारणाच्या कामात प्रत्येक शेतकरी हिरीरिने सहभागी होऊन एक लोक चळवळ उभी करण्याचे आवाहनही श्री. मोरे यांनी केले. या वेळी बी. एस. सय्यद यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीनंतर सर्व शेतकऱ्यांनी टेंभुर्णीतील बॅंक ऑफ़ बड़ोदा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, बॅंक ऑफ़ महाराष्ट्र या शाखांना भेटी देऊन तेथील शाखा व्यवस्थापकांशी चर्चा केल्या. सर्वानींच सकारात्मक प्रतिसाद दिला.

या वेळी गजेंद्र महाराज खोत, बाबासाहेब जगताप, धिरज काबरा, दत्तात्रय देठे, मुकेश खोत, अर्जुन मुनेमाणिक, शंकर खोत, अशोक कोल्हे, पंढरीनाथ देठे, भीमराव भोपळे, शेख नजीर, अमोल अंधारे, भागवत अंधारे, गजानन अंधारे, नितीन अंधारे, अर्जुन जगताप, आण्णा जगताप, पांडुरंग जगताप, दमोता देठे, आण्णासाहेब देशमुख, रामकिसन जगताप, दिलीप बदर, गजानन कऱ्हाळे, संजय साबळे, विजय कऱ्हाळे, शिवाजी देठे, शिवाजी शिंदे, श्रीकिसन देठे, रावसाहेब देठे, श्रीरंग धुपे, ऋषीनाथ देठे, प्रमेश्वर देठे, विठ्ठल देठे, राजू चंदोडकर, अशोक निकस, ज्ञानेश्वर देठे यांच्यासह टेंभुर्णी, नळविहिरा, आंबेगांव, गणेशपूर, पोखरी, निवडूंगा, दहिगाव आदी गावचे शेतकरी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...
शेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित...सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा, गुजरात) :...
व्यवसायाचे तंत्र शेतीच्या नियोजनात ठरले...नाशिक येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळून नरेंद्र...