agriculture news in Marathi, mango, watermelon and musk melon demand increased, Maharashtra | Agrowon

नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगडाला मागणी वाढली
ज्ञानेश उगले
मंगळवार, 1 मे 2018

नाशिक : वाढत्या उन्हाळ्याबरोबरच नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची आवकही वाढती आहे. गत सप्ताहात बहुतांश फळभाज्यांची आवक वाढती राहिली. मुंबईच्या बाजारपेठेतून मागणी स्थिर राहिल्याने दरही स्थिरावलेले होते. या काळात हापूस आंबा, लिंबू, खरबूज, कलिंगड, कारले या शेतमालाला मात्र चांगली मागणी होती. 

नाशिक : वाढत्या उन्हाळ्याबरोबरच नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची आवकही वाढती आहे. गत सप्ताहात बहुतांश फळभाज्यांची आवक वाढती राहिली. मुंबईच्या बाजारपेठेतून मागणी स्थिर राहिल्याने दरही स्थिरावलेले होते. या काळात हापूस आंबा, लिंबू, खरबूज, कलिंगड, कारले या शेतमालाला मात्र चांगली मागणी होती. 

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाशिक बाजार समितीत हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. गत सप्ताहात हापूस आंब्याची दररोज सरासरी ५५० क्विंटलची आवक झाली. या वेळी आंब्याला प्रतिक्विंटलला ११ हजार ते २३ हजार व सरासरी १६ हजार रुपये दर मिळाले. हापूस शिवाय इतरही वाणांच्या आंब्याची आवक बाजार समितीत होत आहे. या वेळी इतर वाणांच्या आंब्याची साधारण ३२ क्विंटल आवक होती. या आंब्याला या वेळी क्विंटलला १५०० ते २५०० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. 

गत सप्ताहात खरबूज आणि कलिंगडाला विशेष मागणी वाढली. खरबुजाची सरासरी १२० क्विंटल आवक झाली. या वेळी खरबुजाला क्विंटलला १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाले. तर कलिंगडाची आवक सरासरी ४२० क्विंटल होती. कलिंगडाला क्विंटलला ५०० ते १२०० व सरासरी ९०० रुपये दर मिळाले. 

दरवर्षी उन्हाळ्यात लिंबाला मागणी वाढते. मागील दीड महिन्यांपासून लिंबाची आवक ३० ते ४० क्विंटल या दरम्यान स्थिर आहेत. मात्र, स्थानिक आणि जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून चांगली मागणी असल्याने लिंबाला तेजीचे दर मिळत आहेत. गत सप्ताहात लिंबाची ३६ क्विंटलची आवक झाली असता लिंबाला प्रति क्विंटलला ५००० ते ७५०० व सरासरी ६२५० असे दर मिळाले. 

या उन्हाळ्यात स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून कारल्याला विशेष मागणी होत आहे. गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत कारल्याची २६४ क्विंटलची आवक झाली. नाशिकच्या दिंडोरी, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर या तालुक्‍यांतून आवक होते. या वेळी कारल्याला प्रतिक्विंटलला २०८० ते ३००० व सरासरी २२०० रुपये दर मिळाले. एकंदरीतच मागणीच्या तुलनेत कारल्याची आवक कमी असल्यामुळे कारल्याला चांगले दर मिळत असल्याचे चित्र दिसून आले. 

कांदा क्विंटलला ३०० ते ६५० रुपये
नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या व ४५ उपबाजारांत प्रामुख्याने कांद्याची आवक होते. त्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे या बाजार समित्यात सर्वाधिक आवक होते. लासलगाव बाजार समितीत गत सप्ताहात सुटीचे दिवस वगळता इतर दिवशी सरासरी १७००० क्विंटल कांद्याची आवक झाली. या वेळी कांद्याला ३०० ते ६५० व सरासरी ६०० रुपये दर मिळाले. नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांतही आवक व दराची हीच स्थिती होती. उन्हाळ कांदा हा साठवणारा कांदा असल्याने सद्यस्थितीत बाजारात आवक कमी आहे. दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे. उत्तम प्रतीचा कांदा साठविला जात असून बहुतांश प्रमाणात दुय्यम दर्जाचा कांदा बाजारात येत आहे. त्यामुळे सध्या कांद्याचे दर स्थिर आहेत. येत्या पंधरा दिवसातही कांद्याचे सद्याचे दर स्थिर राहण्याची स्थिती आहे. असे लासलगाव बाजार समितीचे सचिव बी. वाय. होळकर यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...