agriculture news in Marathi, Manik Shingares research thesis got gold medal of Indian Society of soil science, Maharashtra | Agrowon

माणिक शिनगारे यांच्या शोध प्रबंधाला मृदा विज्ञान संस्थेचे सुवर्णपदक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत परभणी येथील कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी माणिक शिनगारे यांनी बीटी कपाशीच्या पिकासाठी जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणे या विषयावर सादर केलेल्या शोध प्रबंधास भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे (इंडियन सोसायटी आॅफ साॅईल सायन्स) पश्चिम विभागातील उत्कृष्ट प्रबंधाचे पारितोषिक मिळाले.

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत परभणी येथील कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी माणिक शिनगारे यांनी बीटी कपाशीच्या पिकासाठी जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणे या विषयावर सादर केलेल्या शोध प्रबंधास भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे (इंडियन सोसायटी आॅफ साॅईल सायन्स) पश्चिम विभागातील उत्कृष्ट प्रबंधाचे पारितोषिक मिळाले.

माणिक बंडू शिनगारे (रा. दस्तापूर, जि. परभणी) यांना पदव्युत्तर शिक्षणक्रम प्रबंधाकरिता हे पारितोषिक मिळाले आहे. शिनगारे यांनी ‘वनामकृवि’तील मृदाविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सय्यद ईस्माइल यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर पदवी संपादन केली.

सूक्ष्मजीवांचा वापर करून पिकांसाठी लागणारे महत्त्वाचे अन्नद्रव्य जस्त (झिंक) याची कपाशीकरिता उपलब्धता वाढविणे या विषयावरील संशोधन प्रबंध राहुरी येथे मृदा विज्ञान संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सादर केला.

या विषयावर पश्चिम विभागातील पाच विद्यार्थ्यांनी प्रबंध सादर केले. त्यापैकी शिनगारे यांचा प्रबंध उत्कृष्ट ठरल्यामुळे त्यांना सुवर्णपदक आणि प्रशस्तिपत्र असे पश्चिम विभागाचे पारितोषिक जाहीर झाले होते. १३ डिसेंबर रोजी भारतीय मृदा विज्ञान संस्थेच्या कोलकता येथील ८२ व्या अधिवेशनामध्ये संस्थेचे अध्यक्ष डाॅ. एस. के. चौधरी यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या वेळी देशातील नामवंत मृदाशास्त्रज्ञ उपस्थित होते.

याबद्दल शिनगारे यांचे ‘वनामकृवि’चे शिक्षण संचालक डाॅ. व्ही. डी. पाटील, डाॅ. सय्यद ईस्माइल यांनी अभिनंदन केले.

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...