agriculture news in Marathi, Manikrao Thakare says give compensation till 60 thousand rupees to farmers, Maharashtra | Agrowon

गारपीटग्रस्तांना ६० हजारपर्यंत मदत द्या ः माणिकराव ठाकरे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

अकोला ः राज्यात गेल्या दोन दिवसांतील गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी लाख ते दीड लाखापेक्षा अधिक नुकसान झाले. फळबागांचे नुकसान याहीपेक्षा अधिक अाहे. त्यामुळे शासनाने गारपीटग्रस्तांना किमान ५०ते ६० हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत दिली पाहिजे. अापण ही मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याची माहिती विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिली. 

अकोला ः राज्यात गेल्या दोन दिवसांतील गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी लाख ते दीड लाखापेक्षा अधिक नुकसान झाले. फळबागांचे नुकसान याहीपेक्षा अधिक अाहे. त्यामुळे शासनाने गारपीटग्रस्तांना किमान ५०ते ६० हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत दिली पाहिजे. अापण ही मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याची माहिती विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिली. 

सोमवारी श्री. ठाकरे यांनी वाशीम जिल्ह्यतील रिसोड मतदार संघात गारगीपटग्रस्त भागाला भेटी दिल्या. या वेळी अामदार अमित झनक आदी त्यांच्यासोबत होते. श्री. ठाकरे म्हणाले, की वादळी वारा व पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अाहे. गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांची हानी अधिक झालेली अाहे. सोबतच द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले अाहे. ही पाहणी अाटोपल्यानंतर अापण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या हेक्टरी ५० ते ६० हजार रुपयांची मदत तातडीने देण्याबाबत मागणी करणार अाहोत, असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. 

गारपिटीमुळे मृत्यू झालेल्या यमुनाबाई हुंबाड यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यासोबतच केनवड, जोगेश्वरी, जायखेडा, तपोवन, अांचळ, नेतन्सा, लेहणी, वडजी, करंजी गरड, बाळखेडा, महागाव या गावात पाहणी केली.

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...