agriculture news in marathi, Manjari Medica grape variety launched for farmers | Agrowon

‘मांजरी मेडिका’ द्राक्ष ज्यूस वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

पुणे : मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी सतत दहा वर्षांच्या परिश्रमानंतर ज्यूससाठी ‘मांजरी मेडिका’ या नवीन वाणाला व्यावसायिक वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे अतिशय आरोग्यवर्धक असलेल्या या वाणात कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्याची क्षमता असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. 

पुणे : मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी सतत दहा वर्षांच्या परिश्रमानंतर ज्यूससाठी ‘मांजरी मेडिका’ या नवीन वाणाला व्यावसायिक वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे अतिशय आरोग्यवर्धक असलेल्या या वाणात कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्याची क्षमता असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. 

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या विशेष उपस्थितीत ‘मांजरी मेडिका’ वाण विक्रीसाठी खुले करण्यात आले. द्राक्ष संशोधन केंद्राचे (ग्रेप्स एनआरसी) संचालक व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सावंत यांनी ‘मांजरी मेडिका’चा ज्यूस कुलगुरूंना देत या नवीन वाणाची घोषणा केली. 

संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ‘मांजरी मेडिका’च्या ज्यूस स्टॉलचे उद्घाटन कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय पुष्प संशोधन केंद्राचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद व एनआरसीमधील शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते. ‘मांजरी मेडिका’पासून तयार करण्यात आलेले बिस्किट, अन्थोसायनिन पावडर, बियांचे तेल या स्टॉलवर ठेवण्यात आलेले आहेत. 

‘‘एनआरसीचे तत्कालिन प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. करिबसप्पा यांनी द्राक्षाच्या जर्मप्लाझ्मावर विशेष परिश्रम घेत १९९७ पासून मेडिकाचे संशोधन सुरू केले होते. त्यांनी फ्लेम सीडलेस व पुसा नवरंग यांचा संकर करून या नव्या ज्यूस वाणाची निर्मिती केली. मात्र शेतकऱ्यांपर्यंत या वाणाला नेण्यासाठी अत्यावश्यक शास्त्रीय चाचण्या झाल्या नव्हत्या. एनआरसीच्या शास्त्रज्ञ मंडळींनी कष्टपूर्वक काम केल्यामुळे शेतकऱ्यांना आता नवे वाण उपलब्ध झाले आहे,’’ असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. 

तंत्रशुद्ध अभ्यास असलेले द्राक्ष ज्यूस वाण शेतकऱ्यांसाठी खुले केल्याबद्दल कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. एनआरसीच्या बागांमध्ये जाऊन तसेच ज्यूसनिर्मिती युनिटला भेट देत कुलगुरूंनी ‘मांजरी मेडिका’ची माहिती घेतली. ‘‘फलोत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागत असून, त्यात द्राक्षाचे योगदान मोठे आहे. एनआरसीकडून टेबल व्हरायटीपाठोपाठ आता निर्यातक्षम, बेदाणायोग्य, वाइननिर्मितीची आणि आता ज्यूससाठी देखील स्वतंत्र वाण शेतकऱ्यांसाठी आणले गेले आहे. यामुळे द्राक्ष प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल,’’ असे उद्गार डॉ. विश्वनाथा यांनी काढले. 

‘मांजरी मेडिका’ वाणाला शेतकऱ्यांच्या हातात देण्यापूर्वी नाशिक, पुणे, मध्य प्रदेश व कर्नाटकात यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या वाणात भरपूर अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे मेडिका आरोग्यवर्धक असून कोलान कॅन्सर पेशींना मारण्याची क्षमता मेडिकाच्या ज्यूसमध्ये असल्याचे प्राथमिक प्रयोगातून सिद्ध झाले आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. 

अनेक शास्त्रज्ञांचा वाटा 
 द्राक्ष संशोधक डॉ. करिबसप्पा यांनी शोधलेल्या मांजरी मेडिकला शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी एनआरसीमधील अनेक शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मांजरी मेडिकाच्या विविध चाचण्या व तुलनात्मक अभ्यासात डॉ. आर. जी. सोमकुवर, डॉ. अहमद शब्बीर, डॉ. कौशिक बॅनर्जी, डॉ. अजयकुमार शर्मा व स्वतः डॉ. एस. डी. सावंत यांचा सहभाग आहे. 
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...