agriculture news in marathi, Manmohan Shingh, Devendra Fadhanvis | Agrowon

डॉ. मनमोहन सिंगांच्या काळातच अर्थव्यवस्था बिघडली : मुख्यमंत्री फडणवीस
सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नागपूर   : " नोटाबंदीमुळे देशाची लूट झाली, असे म्हणणारे डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या  कार्यकाळात देशामध्ये अनेक आर्थिक घोटाळे झाले व त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक गतीमान झाली आहे ", असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.

नागपूर   : " नोटाबंदीमुळे देशाची लूट झाली, असे म्हणणारे डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या  कार्यकाळात देशामध्ये अनेक आर्थिक घोटाळे झाले व त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक गतीमान झाली आहे ", असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.

नोटाबंदीला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने  मुख्यमंत्र्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. या निर्णयाच्या परिणामाची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, " नोटाबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था सर्वच बाबतीत अधिक भक्कम झाली. डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली. करदात्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. दहशतवाद्यांच्या व नक्षलवाद्यांच्या कारवायांमध्ये घट झाली आहे. काळा पैसा मोठ्याप्रमाणावर बाहेर आला आहे. तसेच लेस कॅश ईकॉनॉमीमध्ये वाढ झाली आहे . "

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीमुळे देशाची लूट झाल्याची टीका केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले, " डॉ. मनमोहन सिंग ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत. परंतु त्यांच्या कार्यकाळातच अनेक घोटाळे झाले आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. नरेंद्र मोदी अर्थतज्ज्ञ नाहीत. ते एक राजकीय व्यक्ती आहेत. परंतु त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळे वळण दिले आहे . "

पेट्रोल व दारुच्या विक्रीला जीएसटी लागू करावीच लागेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,"   देशातील सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी पेट्रोल व दारु जीएसटीच्या परिघात आणू नये, अशी मागणी केली होती. जीएसटीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत पेट्रोल व दारु जीएसटीच्या बाहेर राहील परंतु भविष्यात पेट्रोल व दारुवर जीएसटी लागू करावी लागेल ." 

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....