agriculture news in marathi, many farmer away from Mechanization deprived | Agrowon

यांत्रिकीकरण उपअभियानात अनेक शेतकरी राहणार वंचित
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

जळगाव  ः जिल्ह्यात यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टरचलित अवजारांसाठी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला. पण या तिन्ही योजना मिळून पाच कोटी रुपये निधी मंजूर आहे. दुसऱ्या बाजूला अर्जांची संख्या लक्षात घेता १५ कोटी रुपये निधी या योजनांसंबंधी लागणार आहे; मात्र निधी वाढवून मिळणे अशक्‍य असून, जवळपास दोन हजार लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

जळगाव  ः जिल्ह्यात यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टरचलित अवजारांसाठी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला. पण या तिन्ही योजना मिळून पाच कोटी रुपये निधी मंजूर आहे. दुसऱ्या बाजूला अर्जांची संख्या लक्षात घेता १५ कोटी रुपये निधी या योजनांसंबंधी लागणार आहे; मात्र निधी वाढवून मिळणे अशक्‍य असून, जवळपास दोन हजार लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

मागील मे महिन्यात या योजनेसंबंधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने अर्ज मागविले होते. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व महिलांना ५० टक्के अनुदान देय आहे, तर इतर लाभार्थींना ४० टक्के अनुदान ट्रॅक्‍टरचलित अवजारांसाठी देय आहे. ट्रॅक्‍टर खरेदीसंबंधी अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व महिला यांना सव्वा लाख रुपये आणि इतरांना एक लाख रुपये अनुदान देय आहे. यांत्रिकीकरण उपअभियानासंबंधी ८५ लाख निधी मंजूर होता, उर्वरित दोन योजनांसाठी चार कोटी १५ लाख निधी मंजूर होता.

लाभ द्यायला सुरवात
या योजनेतून अर्जदारांना लाभ देण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत साडेचार कोटी रुपये अनुदानाएवढी अवजारे व ट्रॅक्‍टर याचे वाटप झाले असून, सर्व तालुक्‍यांमध्ये समान वितरण करण्याचा प्रयत्न कृषी विभागाने केला आहे.

२५ टक्के निधीची प्रतीक्षा
या योजनांचा २५ टक्के निधी अजून प्राप्त झालेला नाही; परंतु लवकरच हा
निधी प्राप्त होईल आणि उर्वरित लाभार्थींना वितरण होईल. या योजनेतून लाभार्थी आपल्याला हव्या त्या प्रमाणात कंपनीचे अवजार किंवा ट्रॅक्‍टर खरेदी करू शकतो. खरेदीनंतर अनुदान त्याच्या खात्यावर वितरित केले जात असल्याचे सांगण्यात आले.

योजनेबाबत गती
कृषी विभागाने या योजनेसंबंधी गतीने कार्यवाही केली आहे. जेवढे अर्ज आले होते त्यातील पात्र लाभार्थींना अवजारे खरेदीची परवानगी देऊन अनुदानाचेही अवजार खरेदीनंतर लागलीच वितरण केले, अशी माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...