agriculture news in marathi, Many farmers deprived of encouragement grants | Agrowon

प्रोत्साहन अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित
अभिजित डाके
रविवार, 14 जानेवारी 2018

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. मात्र प्रोत्साहन अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी राहिल्या असून त्या दुरुस्त करण्यासाठी किती दिवस लागणार, याबाबतची माहिती कोणाकडेही उपल्बध नाही. यामुळे अनेक शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असल्याचे सांगलीत जिल्ह्यातील चित्र आहे.

जिल्ह्यात सुमारे एक हजार ते १३०० शेतकरी तर राज्यात अंदाजे ७० हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या लाभापासून वंचित असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. मात्र प्रोत्साहन अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी राहिल्या असून त्या दुरुस्त करण्यासाठी किती दिवस लागणार, याबाबतची माहिती कोणाकडेही उपल्बध नाही. यामुळे अनेक शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असल्याचे सांगलीत जिल्ह्यातील चित्र आहे.

जिल्ह्यात सुमारे एक हजार ते १३०० शेतकरी तर राज्यात अंदाजे ७० हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या लाभापासून वंचित असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.

कर्जमाफीच्या अर्जामध्ये झालेल्या चुका या नगण्य असल्याचे समजते. त्यामुळे राज्यात किती शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत, याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे चित्र आहे. मात्र, जिल्ह्यातील एक हजार ३०० शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत. जिल्ह्यातून अनुदानासाठी १ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी ६२ हजार ९५ शेतकऱ्यांना ९१.५३ कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे.

कर्जमाफीची रक्कम देत असताना अनेक त्रुटींना सामोरे जावे लागत आहेत. चुकींची दुरुस्ती दररोज करावी लागत असल्याचे चित्र आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनाचे अनुदान २५ टक्के दिले जाणार आहे. आजअखेर ६२ हजार ९५ शेतकऱ्यांना हे अनुदान दिले आहे.

बॅंकांची चुकीची माहिती
भरल्याने शेतकरी हवालदिल

कर्जमाफीचा अर्ज भरताना शेतकऱ्यांची माहिती महा ई सेवा केंद्रात भरली गेली. पण बॅंकेमधील संबंधित कर्जदाराची माहिती भरत असताना अनेक बाबी चुकीच्या भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे अनुदान दुसऱ्याच्या नावावर वर्ग होत असून या कारणांमुळे प्रोत्साहन अनुदान वर्ग करण्याचे थांबविले आहे. सांगली जिल्ह्यात नियमित कर्जदारांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान जमा केले होते. मात्र, अर्जामध्ये भरण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचे लक्षात येताच संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली रक्कम तातडीने परत घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार ३०० शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत.

कर्जमाफीतील त्रुटी शासनासाठी क्षुल्लक
शासनाने शेकतऱ्यांना कर्जमाफी दिली खरी. यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र, यामध्ये सातत्याने चुका होऊ लागल्या आहेत. या चुका दुरुस्त करण्यासाठी शासन पातळीवर किती दिवस लागणार आहेत. याची माहिती सध्यातरी कोणाकडेच उपलब्ध नाही. यामध्ये झालेल्या चुका किंवा राहिलेल्या त्रुटी शासनाला क्षुल्लक वाटत आहेत.

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...