agriculture news in marathi, Many farmers rehearse the insurance policy | Agrowon

अनेक शेतकऱ्यांनी फिरविली विम्याकडे पाठ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

``विमा कंपन्या ठरावीक मंडळांतील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देतात. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार बागायतीला तेरा हजार पाचशे, जिरायती शेती असल्यास सहा हजार आठशे भरपाई असल्यास ती दिली गेली पाहिजे. विमा कंपनी हा कायदा मानत नाही. विमा कंपन्यांचा शेतकऱ्यांकडून पैसे काढण्याचा गोरखधंदा आहे.``
- एस. बी. पाटील, शेतकरी, चोपडा (जि. जळगाव)

जळगाव : पीकविम्याची रक्कम भरल्यानंतरही आपत्ती आल्यास ठरावीक शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळतो. अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांची नुकसानीनंतर चोवीस तासांच्या आत नोंद घेऊन त्याबाबत दिल्लीतील विमा केंद्रास कळविले जात नाही. पीकविमा हप्त्याची रक्कम अधिक अन् भरपाई कमी, यासह विविध कारणांमुळे शेतकरी पीकविम्याकडे पाठ फिरवितात, असे चित्र आहे. यातच मोजक्‍याच शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळतो, असा आरोप प्रगतिशील शेतकरी एस. बी. पाटील (चोपडा) यांनी केला आहे.

जिल्ह्यात २०१७ मध्ये ८५ हजार ५७८ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. त्यातील ३० हजार ६६३ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळाला. ५४ हजार ९१५ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.

पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना अपूर्ण पाऊस, पावसाचा खंड व अतिप्रमाणात पाऊस, या तीन हवामान घटकांच्या धोक्‍यापासून संरक्षण मिळते. जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंका पीक कर्ज देतानाच पीकविम्याची रक्कम कापून घेते. जे शेतकरी मात्र कर्ज घेत नाहीत ते पीकविमा भरत नाहीत. त्यांनीही पीकविमा काढावा, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करतो.

काय आहे स्थिती :
शेतकरी लाखो रुपयांचा पीकविमा काढतात. मात्र, नुकसान झाले तर त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. काही ठरावीक महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना नुकसानीचा विमा मिळतो, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. ज्या ठिकाणी विमा कंपन्यांनी हवामान मापक यंत्रे उभारली आहेत, त्यातील काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना विम्याचा कंपनीच्या मनमानीप्रमाणे लाभ मिळतो.

काय हवी उपाययोजना :
शासनाच्या महसूल मंडळात हवामानमापक यंत्रे आहेत, त्या ठिकाणावरूनच संबंधित विमा कंपन्यांनी नुकसानीची माहिती घेऊन भरपाई दिली पाहिजे. नुकसानभरपाई देताना मागील तीन वर्षांचा आढावा घेऊन भरपाई दिली जाते. जर शंभर रुपयांचा विमा काढला असेल तर विम्यापोटी केवळ वीस रुपये मिळतात. तक्रारीसाठी शेतकरी महसूल विभागाकडे गेल्यास ते विमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे जाण्यास सांगतात. कृषी विभागाकडे गेल्यास ते महसूल विभाग पंचनामे करतो त्यांच्याकडे जाण्यास सांगतात.

आकडे बोलतात..
पीकविम्याची २०१७ मधील स्थिती
* विमा काढलेले शेतकरी- ८५ हजार
* लाभ मिळालेले शेतकरी- ३० हजार
* वंचित शेतकरी- ५४ हजार
* भरलेली रक्कम- १६.३३ कोटी

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...