agriculture news in marathi, Many opportunities in the processing industry says Rahit Pawar | Agrowon

प्रक्रिया उद्योगात अनेक संधी : रोहित पवार
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

पुणे : अनेक युवा उद्योजक शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करतात. त्यातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यालाच शेतीचे ‘फॉरवर्ड इंटिग्रेशन’ म्हटले जाते. यापुढील काळात कृषी प्रक्रिया उद्योगात अनेक संधी आहेत, असे प्रतिपादन बारामती ॲग्रोचे अध्यक्ष तथा इंडियन शुगर्स मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहित पवार यांनी येथे केले.

पुणे : अनेक युवा उद्योजक शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करतात. त्यातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यालाच शेतीचे ‘फॉरवर्ड इंटिग्रेशन’ म्हटले जाते. यापुढील काळात कृषी प्रक्रिया उद्योगात अनेक संधी आहेत, असे प्रतिपादन बारामती ॲग्रोचे अध्यक्ष तथा इंडियन शुगर्स मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहित पवार यांनी येथे केले.

दिव्य सारथी प्रतिष्ठान आणि साकव यूथ फोरम यांच्या वतीने नुकताच (ता.४) मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स सभागृहात आयोजित 'चावडी महाराष्ट्रा'ची या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस होते. या वेळी माजी उपमहापौर दीपक मानकर, ॲड. रवींद्र रणसिंग, आनंद जाधव यांची उपस्थित होते.

पवार म्हणाले, की आज शहरातील मॉलमध्ये शेतमालावर प्रक्रिया सहज उपलब्ध होतात. उसापासून अनेक फळांचे रस येथे मिळतात, याकरिता अधिक किंमत मोजण्यासाठी ग्राहक तयार असतात. शेतीमध्ये तुम्ही प्रक्रिया उद्योग म्हणजेच ‘फॉरवर्ड इंटिग्रेशन’ केले, तर नक्कीच उद्योजक बनू शकता. मात्र उद्योग करण्याचा केवळ विचार न करता त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.

याप्रसंगी प्रतिष्ठान आणि फोरमच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ‘यूथ कनेक्ट अभियानास श्री. पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी प्रतिष्ठानचा वीर खाशाबा जाधव पुरस्कार महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यास आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार शांताराम कुंजीर यांना देण्यात आला.

मान्यवरांची याप्रसंगी भाषणे झाली. अंगद माने यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमास अक्षय काटे, पूजा झोळे, सागर पवार, रुपेश टेकाळे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन रवींद्र देशमुख यांनी तर आभार राजेश्वर देशमुख यांनी मानले.

इतर बातम्या
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मराठवाड्याला पिंजार-दमणगंगा खोऱ्यातून...नांदेड  ः मराठवाड्याच्या वाट्याचे कृष्णा...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...