जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेच

जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेच
जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेच
जळगाव : पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दडी मारल्याने शेतामध्ये आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, दुसरीकडे धरणांमध्ये ठणठणाट आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पाऊस सरासरी ८३ मिलिमीटरने कमी झालेला आहे. यातच जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
जून महिन्यात पावसाने अनेक दिवस ओढ दिली. जुलै महिन्यात आठ ते दहापासून सतत पाऊस सुरू होता. यामुळे पिकांची स्थिती समाधानकारक आहे. पेरण्या शंभर टक्के पूर्ण झाल्या आहेत. मशागतीचे काम अनेक भागांत आटोपले आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६६४ मिलिमीटर आहे. आतापर्यंत केवळ २५३ मिलिमीटर असा एकूण केवळ ३३ टक्के पाऊस झाला आहे. 
 
तालुका   
पाऊस (मिलिमीटरमध्ये)
जळगाव    २४८.५
जामनेर   २१५.१
एरंडोल        ३२२.४
धरणगाव ३५१.६
भुसावळ     १८७.२
यावल २११.७
रावेर    २१९.८
मुक्ताईनगर   १९७.७
बोदवड       २८७.७
पाचोरा   २४४.३
चाळीसगाव २४६.१
भडगाव  २३५.८
अमळनेर      २२८.८
पारोळा       ३३४.६
चोपडा  २७२.६
एकूण  २५३.६
धरणातील साठा (दलघमीमध्ये)
धरणाचे नाव   पाणीसाठा
हतनूर   २०९.३०
गिरणा    ३८८.१३
वाघूर   २२८.५०
अभोरा    ३१४.००
मंगरूळ    ३२७.६८
सुकी    ३६७.९१
मोर   ३१४.७९
हिवरा    २८०.४०
बहूळा   २४४.०
तोंडापूर   ३७९.७६
अंजनी    २२०.७२
गूळ    २६१.२५
भोकरबारी    २२७.५०
बोरी        २६२.१६
मन्याड ३६४.२९
अग्नावती ०.०

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com