नांदेड, परभणी, हिंगोलीत कडकडीत बंद

नांदेड, परभणी, हिंगोलीत कडकडीत बंद
नांदेड, परभणी, हिंगोलीत कडकडीत बंद

नांदेड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गुरुवारी (ता. ९) नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात कडकडीत बंद होता. ठिकठिकाणी रास्ता रोको, ठिय्या, भजन आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजातर्फे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात गुरुवारी (ता. ९) पहाटे चारपासून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले.

नांदेड शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरात अनेक ठिकाणी रस्त्यावर बैलगाड्या लावून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परभणी जिल्ह्यात परभणी शहरातील खानापूर फाटा, कृषी विद्यापीठ गेट, विसावा फाटा या ठिकाणी भजन, कीर्तन, पोवडे गायन करीत आंदोलन करण्यात आले.

मानवत तालुक्यात रस्त्यावर म्हशी सोडून त्यांना पेंड देत सरकारचा निषेध करण्यात आला.जिल्हाभरात अनेक ठिकाणी रस्त्यावरच जेवण करण्यात आले. पालम तालुक्यात मुख्यमंत्र्यांचे श्राद्ध घालण्यात आले. पूर्णा येथे रेल्वेगाड्यावर दगडफेक करण्यात आली. या तीनही जिल्ह्यांतील बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती. बस वाहतूक, शाळा, महाविद्यालये बंद होती. रस्त्यावर शुकशुकाट होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com