agriculture news in marathi, Maratha kranti moarch to march on Mantralaya, mumbai | Agrowon

मराठा क्रांती मोर्चाची उद्या मंत्रालयावर धडक
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद : मराठा समाजाने वेळोवेळी मांडलेल्या कोणत्याही मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाहीत. यावर समाजाची भावना लक्षात घेऊन मागण्यांच्या कार्यवाहीचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी (ता. 14) मंत्रालयावर धडक जाण्याविषयी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बैठकीत रविवारी (ता. 12) एकमत झाले. 

औरंगाबाद : मराठा समाजाने वेळोवेळी मांडलेल्या कोणत्याही मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाहीत. यावर समाजाची भावना लक्षात घेऊन मागण्यांच्या कार्यवाहीचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी (ता. 14) मंत्रालयावर धडक जाण्याविषयी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बैठकीत रविवारी (ता. 12) एकमत झाले. 

सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, पदाधिकारी, समन्वयक मंगळवारी मंत्रालयावर धडकणार आहेत. मंत्रालयातील चर्चेसंदर्भात शहरातील सिंचन भवन येथे पूर्वबैठक पार पडली. बैठकीत सरकारला जाब विचारण्याबाबत चर्चा झाली. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना चार नोव्हेंबर रोजी औरंगाबादेतील क्रांती चौक येथे जाब विचारण्यात येणार होता; परंतु मुख्यमंत्री न आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा मुंबईला जाऊन सरकारला जाब विचारेल, अशी प्रतिक्रिया समन्वयकांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना मंगळवारी चर्चेला बोलावले. हा प्रस्ताव आजच्या बैठकीत मान्य करण्यात आला. या चर्चेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील 5 ते 10 समन्वयकांनी मंगळवारी मंत्रालय, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
आता खाण्यातही क्रिकेट !क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...
चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...
संत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...