जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
तुळजापूर, जि. उस्मानाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापूरमधून सुरूवात झाली आहे. जागरण गोंधळासाठी हजारो मराठा बांधव तुळजापुरात दाखल झाले आहेत. तुळजापुर पासून आज (ता. २९) मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला सुरवात होणार असून आई तुळजभवानी मंदिरासमोर जागरण गोंधळ करून गनिमी काव्याने आंदोलनाला सुरवात करण्यात येणार आहे.

आज होणाऱ्या जागरण गोंधळ आंदोलनासाठी हजारो मराठा बांधव तुळजापुरात दाखल झाले आहेत. आजच्या आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण तुळजापूर शहरात ठिकठिकाणी बॅनर आणि कमानी उभारण्यात आला आहेत. सकाळपासून आलेल्या कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवाजी, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अश्या घोषणांनी शहर दुमदुमून सोडले आहे. जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव तुळजापुरात दाखल होत आहेत.
- 1 of 348
- ››