agriculture news in marathi, Maratha Kranti Morcha's 'Solapur Bandh' on Monday | Agrowon

मराठा क्रांती मोर्चाचा सोमवारी ‘सोलापूर बंद'
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 जुलै 2018

सोलापूर  : मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी (ता. ३०) सोलापूर बंद पुकारला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीमुळे वारकरी घरी जाईपर्यंत आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाने घेतला होता. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सोलापुरात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.  त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले. शहरात सगळे व्यवहार काहीसे सुरळीत होते, पण जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी पडसाद उमटलेच.

सोलापूर  : मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी (ता. ३०) सोलापूर बंद पुकारला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीमुळे वारकरी घरी जाईपर्यंत आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाने घेतला होता. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सोलापुरात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.  त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले. शहरात सगळे व्यवहार काहीसे सुरळीत होते, पण जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी पडसाद उमटलेच. करमाळा, मोहोळ, माढा तालुक्‍यात काही गावात बंद पाळून सरकारचा निषेध करण्यात आला.

बुधवारी (ता.२५) पुन्हा मोहोळ तालुक्‍यातील पापरी, करमाळा तालुक्‍यातील केममध्ये पूर्णतः बंद पाळण्यात आला. त्याशिवाय सांगोला, मंगळवेढा, बार्शी आणि माढ्यातील काही भागातही बंदची स्थिती राहिली. तसेच अनेक ठिकाणी तहसीलदार आणि प्रांतांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा, शैक्षणिक संस्थांनी मराठा विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देणारे निवेदन बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.

 आज होणार महत्त्वपूर्ण बैठक

शासनाने आदेश देऊनही जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून १०० टक्‍के शुल्क घेतले आहे. काहींनी विद्यार्थ्यांना ते परतही केलेली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता.२६)  सकाळी ११ वाजता बैठक होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी आंदोलनकर्त्यांना आश्‍वासन दिले.

इतर बातम्या
गहू पिकाचे जनुकीय विश्लेषण, सुसंगत...आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने गहू पिकाचे...
पुणे जिल्ह्यातील नद्या दुथडी, धरणांतून...पुणे : जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेल्या...
वऱ्हाडात पावसाचे जोरदार पुनरागमनअकोला  : दोन दिवस उसंत घेतल्यानंतर वऱ्हाडात...
पुणे विभागात पावसामुळे खरीप पिकांना...पुणे ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तूर,...
मराठवाड्यात ८५ मंडळांत पावसाचे धूमशानऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८५ मंडळांत पावसाने...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने...
नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागात पावसाची...नगर ः नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवार...
पॉस मशिनवर स्टॉक; प्रत्यक्षात टंचाईकोल्हापूर : युरिया मुबलक असल्याचे कृषी विभागाचा...
वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीने १४ हजार... वाशीम : जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून पाऊस पुन्हा...
खान्‍देशात जोरदार पाऊसजळगाव : खानदेशात मागील २४ तासांत अनेक ठिकाणी...
वरखेडे-लोंढे बॅरेजला `नाबार्ड`चा...चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव व भडगाव तालुक्‍...
नाशिक जिल्ह्यातील ४० वाळू घाट होणार बंदनाशिक  : वाळू घाटावरील प्रदूषण रोखण्यासाठी...
‘सिद्धेश्‍वर’, ‘भीमा’च्या कारवाईला...सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न...
बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम...मुंबई: राज्याला बियाणे उत्पादनात स्वयंपूर्ण...
सोलापूर जिल्ह्यात पावसाची संततधारसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी...
शासनाच्या नव्या निर्णयाचा महाबीज,...अकोला ः महाबीज आणि राष्ट्रीय बीज निगम यांच्या...
बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत बांधणी...मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या...
राज्यातील धरणांमध्ये ५९ टक्के पाणीसाठापुणे : सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह, मध्य...
गुणवत्तेच्या नावाखाली दूधदर कपातीचा...मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी...
...तर दूध उत्पादकांना २५ रुपये दर देणे...पुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर...