मराठा क्रांती ठोक मोर्चाने परळी दणाणली

मराठा क्रांती ठोक मोर्चाने परळी दणाणली
मराठा क्रांती ठोक मोर्चाने परळी दणाणली

बीड : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता. १८) येथे काढण्यात आलेल्या ठोक मोर्चा आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. आरक्षण जाहीर झाल्याशिवाय उठायचे नाही, असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्यभर निघालेल्या मूक मोर्चानंतर तुळजापूर व बुधवारी परळीत हा ठोक मोर्चा निघाला.

सकाळी दहा वाजेच्या दरम्यान विविध भागांतून वाहनांनी मोर्चेकरी शहरात जमा झाले. सुरवातील येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याला कोपर्डी (जि. नगर) येथील पीडितेच्या वडिलांच्या हस्ते पुष्पहार घालून मोर्चाला सुरवात झाली. पुतळ्यापासून मोर्चेकरी घोषणा देत तहसील कार्यालयाजवळील मैदानावर एकत्र आले. या ठिकाणी प्रमुख भाषणांमधून समाजाच्या प्रश्नांचा ऊहापोह करण्यात आला. शासन समाजाची

दिशाभूल करत असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. दरम्यान, दुपारी तीन वाजेपर्यंत मोर्चेकरी याच ठिकाणी होते. आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत परळी सोडणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी आक्रमक घोषणाबाजी केली. शासनाविरोधी घोषणांनी परळी दणाणून गेली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परळीत पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. शहर भगवेमय दिसत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com