मराठा क्रांती ठोक आंदोलकांचा दुसऱ्या दिवशीही ठिय्या

परळीत आंदोलकांचा दुसऱ्या दिवशीही ठिय्या
परळीत आंदोलकांचा दुसऱ्या दिवशीही ठिय्या

बीड ः : मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शासनाने मेगाभरती करू नये, या मागणीसाठी परळीत बुधवार (ता. १८) पासून सुरू झालेला मराठा क्रांती ठोक मोर्चाची धग आणि पाठिंबा जिल्ह्यात वाढत आहे.

परळीत मोर्चेकऱ्यांनी तहसील आवारातच रात्र काढून गुरुवारीही (ता. १९) ठिय्या सुरूच आहे. गुरुवारी बीडमध्ये ठिय्या आंदोलन, वडवणीत रास्ता रोको तर टालेवाडी (ता. माजलगाव) येथे बस फोडण्यात आली. ठोस आश्वासनाशिवाय परळीतून माघार नाही, असा पवित्रा घेत आंदोलकांनी रात्रीचा मुक्कामही केला. बुधवारी दुपारी परळीतून मोर्चा निघाल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोचला. त्यानंतर ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलक रात्रभर उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या मांडून होते.

दरम्यान, आंदोलनस्थळीच खिचडी शिजवून सहभागींना देण्यात आली. तर, परळीतील काहींनी पिठल- भाकर पुरवली. रात्री दहा वाजेच्या दरम्यान कीर्तन झाले. तर, त्यानंतर जागरण गोंधळ झाला. रात्रभर आंदोलक सरकारविरोधात घोषणा आणि बोंबा मारून निषेध करत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com