agriculture news in marathi, maratha strike is very successful in in solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात आंदोलनाचे तीव्र पडसाद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 जुलै 2018
सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद जाहीर केला, पण आषाढी एकादशीच्या वारीमुळे अद्यापही वारकरी पंढरपुरात आहेत. वारकऱ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी पंढरपुरात आलेला वारकरी त्याच्या घरी जाईपर्यंत आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चान घेतला, त्यानुसार सोलापूर शहरात सर्वत्र शांतता आणि सुरळीत व्यवहार सुरू राहिले, पण राज्यातील अन्य घटनांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी पडसाद उमटलेच. पंढरपुरात वाहतूक सुरळीत राहिली, त्यामुळे वारकरी परतीच्या मार्गावर निघाले आहेत, पण मोहोळ, करमाळा, माळशिरस, सांगोल्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला.
सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद जाहीर केला, पण आषाढी एकादशीच्या वारीमुळे अद्यापही वारकरी पंढरपुरात आहेत. वारकऱ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी पंढरपुरात आलेला वारकरी त्याच्या घरी जाईपर्यंत आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चान घेतला, त्यानुसार सोलापूर शहरात सर्वत्र शांतता आणि सुरळीत व्यवहार सुरू राहिले, पण राज्यातील अन्य घटनांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी पडसाद उमटलेच. पंढरपुरात वाहतूक सुरळीत राहिली, त्यामुळे वारकरी परतीच्या मार्गावर निघाले आहेत, पण मोहोळ, करमाळा, माळशिरस, सांगोल्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी उपोषण, ठिय्या आंदोलन झाले. जिल्ह्यातील बहुतेक सर्व शाळा बंद राहिल्या.
 
मराठा समाजातील कार्यकर्ते बाजारपेठेमध्ये, मार्केट यार्डमध्ये फिरून सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद नसल्याचे सांगत आहेत. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही समाजाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, चार हुतात्मा पुतळ्यांसमोर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
बंद शाळा सुरू ठेवण्याचेही आवाहन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. सोलापूर शहरातील शाळा सुरू आहेत. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील बाजारपेठा चालू ठेवण्यासंदर्भात कार्यकर्ते स्वतः जाऊन सांगत होते. त्यामुळे शहरात काहीसे सुरळीत वातावरण होते, पण जिल्ह्यात मात्र त्याचे तीव्र पडसाद उमटले. सकाळपासून जिल्ह्यात मोहोळ, मोडनिंबला बाजारपेठा बंद राहिल्या. वैराग, कुर्डुवाडीतही बंद पाळण्यात आला. त्याशिवाय माढा, श्रीपूरमध्ये उपोषण करण्यात आले. सांगोल्यातही सकाळपासूनच तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. करमाळ्यात एसटी स्थानकाच्या बाहेर टायर जाळण्यात आले. पिंपळनेरमध्येही रस्त्यावर पेटते टायर टाकण्यात आले. मंगळवेढ्यातील भोसेमध्ये रस्त्यावर लाकडाची ओंडके टाकून रास्ता-रोको करण्यात आला. 

इतर बातम्या
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
दुष्काळप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार...हिंगोली : दुष्काळ जाहीर करण्याच्या जाचक...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
पालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमयेवला, जि. नाशिक : येवला तालुक्यात दुष्काळाची...
मराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी जळगाव ः तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...
अमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणीअमरावती  ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी...
वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा ः...यवतमाळ  ः वन्यप्राण्यांचा जिव्हाळा...
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...