agriculture news in marathi, Maratha Youth to get no-interest loan, Chandrakant Patil, Maharashtra | Agrowon

मराठा तरुणांना १० लाखांपर्यंत लवकरच बिनव्याजी कर्ज
सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मुंबई : मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी १० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची योजना तयार करावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उद्योग कर्ज वितरणासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्याज सवलतीची नवीन योजना तयार केली जाणार आहे.

मुंबई : मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी १० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची योजना तयार करावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उद्योग कर्ज वितरणासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्याज सवलतीची नवीन योजना तयार केली जाणार आहे.

राज्यात वर्षभर मराठा समाजातील तरुणांनी प्रत्येक जिल्ह्यात मूक मोर्चे काढले होते. मराठा समाजाच्या मागण्यांना प्रतिसाद देताना राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीने हा निर्णय घेतला आहे. या समाजाच्या मागण्यांसंदर्भात स्थापन झालेल्या उपसमितीची तिसरी बैठक मंगळवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत ६०५ अभ्यासक्रमांचा समावेश, सारथी संस्थेचे कामकाज, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या निर्णयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पाटील म्हणाले, की मराठा समाजातील तरुणांनी स्वयंरोजगारासाठी १० लाखांपर्यंत बॅंकेमार्फत कर्ज घेतल्यास त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येईल.

कर्जाची मर्यादा ५० लाखांपर्यंत करण्यासंदर्भातही महामंडळाने प्रस्ताव तयार करावा. गट प्रकल्प कर्ज योजनेचा आराखडाही सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या विषयावर पाठपुरावा करतानाच यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.

मंत्र्यांवरील जबाबदारी...

  • विनोद तावडे ः मराठा आरक्षणाशी संबंधित कायदेशीर बाबी आणि कोपर्डी खटल्याचा पाठपुरावा
  • सुभाष देशमुख ः अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगारासाठी १० लाखांपर्यंत कर्ज
  • संभाजी पाटील-निलंगेकर ः मराठा तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण
  • एकनाथ शिंदे ः प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृहे उभारणी, काही महिन्यांत किमान चार ते पाच जिल्ह्यांत वसतिगृहांचे काम सुरू होण्यासाठी प्रयत्न
  • चंद्रकांत पाटील ः छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि कुणबी दाखल्यात येणाऱ्या अडचणी
  • गिरीश महाजन ः ऐनवेळच्या समस्या, अडचणी.

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...