agriculture news in marathi, Marathi Farmer literature meet starts form today in mumbai | Agrowon

मुंबईत आजपासून मराठी शेतकरी साहित्य संमेलन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

संमेलनाध्यक्षपदी डॉ. विट्ठल वाघ; मकरंद अनासपुरे करणार उद्‌घाटन
मुंबई : कृषिजगताला भेडसावणाऱ्या समस्यांची मराठी साहित्यविश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेती अर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करणे आणि सर्जनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी आज (ता. ३१)पासून येथे चौथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

संमेलनाध्यक्षपदी डॉ. विट्ठल वाघ; मकरंद अनासपुरे करणार उद्‌घाटन
मुंबई : कृषिजगताला भेडसावणाऱ्या समस्यांची मराठी साहित्यविश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेती अर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करणे आणि सर्जनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी आज (ता. ३१)पासून येथे चौथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर (प्रभादेवी, दादर) येथे होत असलेल्या संमेलनाचे उद्‍घाटन सिनेकलाकार मकरंद अनासपुरे यांचे हस्ते होणार असून, अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सरोजताई काशीकर अाणि ज्येष्ठ शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष अभिजित फाळके, तर कार्याध्यक्ष गंगाधर मुटे आहेत.

संमेलनात “आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि स्वामिनाथन आयोग”, "आलं वरिस राबूनं, आम्ही मरावं किती?", “शेतकरीविरोधी कायद्यांचे जंगल”, “चला पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली”, अशा विविध विषयांवरील एकूण ४ परिसंवाद, शेतकरी कवी संमेलन आणि शेतकरी गझल मुशायरा असे सत्र आहेत. काळ्या मातीशी इमान राखणारे लेखन करायचे असेल तर सर्जनशीलतेला पहिल्यांदा भ्रामक कल्पनांतून बाहेर काढले पाहिजे. लेखनशैलीचा उपजतपणा, स्फूर्ती, प्रतिभा व परकाया प्रवेश वगैरे कल्पनांना टाळून कृत्रिम का होईना, पण वास्तवाला चितारणारी अभ्यासपूर्ण लेखनशैली जाणीवपूर्वक विकसित करण्यासाठी या संमेलनाचे प्रयोजन आहे.

संमेलनात १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, स्वागत समिती आणि सल्लागार समिती अशा पाच समित्या गठित करण्यात आल्या असून, या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, जनार्दन म्हात्रे आणि ॲड. सतीश बोरुळकर यांची निवड करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...