agriculture news in marathi, Marathi language day, Assembly session | Agrowon

भाषादिनीच विधिमंडळात मराठीसाठी एल्गार !
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई : राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याच्या मागणीवरून मराठी भाषादिनी (मंगळवारी, ता. २७ ) विधिमंडळात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले होते. तर दोन्ही सभागृहांत मराठीच्या ज्ञानभाषेच्या संदर्भात ठराव मांडण्यात आला.

मुंबई : राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याच्या मागणीवरून मराठी भाषादिनी (मंगळवारी, ता. २७ ) विधिमंडळात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले होते. तर दोन्ही सभागृहांत मराठीच्या ज्ञानभाषेच्या संदर्भात ठराव मांडण्यात आला.

सुरवातीलाच मराठी अभिमान गीताची कडवी ७ असतानाही फक्त ६ कडवी असलेले पत्रक वाटण्यात आल्याची बाब अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये अभिमान गीत सुरू असतानाच माईक बंद पडल्याची बाब लक्षात आणून देतानाच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे कोणी मुद्दाम करत आहे का? हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले होते आणि त्यातून कोणाला काय मिळतेय याची चौकशी करा, अशी मागणीही अजित पवार यांनी सभागृहात केली. मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठीचा अपमान होत असल्याच्या या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटे तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू झाल्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, की ही मूळ कविता सुरेश भट यांनी रूपगंधामध्ये प्रकाशित केली होती. त्यांनतर रूपगंधा पुस्तकात सुरेश भट यांनी सहा कडवी असलेली कविताच प्रकाशित केली होती. अभिमान गीतात सहाच कडवी म्हटली जातात, असेही तावडे यांनी सांगितले.

मराठी विषय शाळांमध्ये सक्तीचा करा; कारण काही मुलांना मराठी नीट वाचता किंवा लिहिता येत नाही. कर्नाटकात कन्नडची सक्ती आहे, तर महाराष्ट्रात मराठीची सक्ती का नाही? असा सवाल करत राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी ‘मला कुणाचा अपमान करायचा नाही; पण सभागृहातील काही सदस्यांनाही मराठी नीट येत नाही’, याबाबत नाराजी व्यक्त करतानाच मराठी भाषा टिकण्यासाठी हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा निर्णय घेतला तरच मराठी भाषा टिकेल, अशी भूमिका पवार यांनी या वेळी घेतली. सभागृहातदेखील काही सदस्यांना मराठी येत नाही. महाराष्ट्रात राहिल्यावर मराठी लिहिता-वाचता आले पाहिजे. पुढच्या एक जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मराठीची सक्ती शाळांमध्ये करण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. सध्या आठवीपर्यंत मराठी सक्तीची आहे. मराठीची सक्ती 10 वी पर्यंत करावी की 12 वीपर्यंत करावी यासाठी विचार सुरू असल्याचे सांगत याचे धोरण अभ्यास मंडळ ठरवते. त्यामुळे सभागृहात आलेला हा विषय अभ्यास मंडळासमोर ठेवू, असे तावडे यांनी सभागृहात सांगितले. एकीकडे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत; मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची पत्रके येताहेत, असा आरोप करत राज्यातील १,३०० शाळा बंद केल्या असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. मराठी भाषेच्या प्रती बेगडी प्रेम हे सरकार दाखवित असल्याचे विखे म्हणाले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी?
सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी देणार हा मुद्दा सभागृहामध्ये लावून धरला; मात्र त्यावर योग्य ते उत्तर न दिल्यामुळे सभागृहामध्ये गोंधळ झाला आणि त्यामुळे सभागृह काही काळासाठी तहकूब करण्यात आले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे होती. त्या कामाची सद्यःस्थिती काय आहे? दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय कधीपर्यंत घ्याल, असे सवाल गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये केले.

विधान परिषदेतही मराठी भाषेसाठी गोंधळ...
मराठीचा ढोल बडवत गेल्या चार वर्षांत जे सत्तेवर बसले आहेत, त्यांना हा ठराव मांडावा लागला यापेक्षा जास्त नामुष्की मराठी भाषेवर आलेली नाही, असा टोला आमदार सुनील तटकरे यांनी सभापतींच्या मराठी भाषेच्या ठरावावर बोलताना सरकारला लगावला. लोकराज्य मासिक गुजराथीमध्ये चालू करण्याची किमया याच सरकारच्या काळात झाली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर असे झाले नसते. एका बाजूला आपण बेळगावात कानडीच्या सक्तीच्या विरोधात लढत आहोत, दुसऱ्या बाजूला लोकराज्य गुजराथीत चालू करण्याचे शिवसेना समर्थन करत आहे, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही, असेही तटकरे म्हणाले. आम्ही सत्तेत असताना मराठी रात्रशाळा सुरू केल्या होत्या. आज मराठी शाळांची गळचेपी केली जात आहे. या निर्णयाचा सरकार खुलासा करेलच; पण राज्यातील ग्रामीण भाग व कोकणातील वाड्या-वस्त्यांतील विद्यार्थ्यांना याची झळ बसेल, असे तटकरे म्हणाले.

मराठी भाषा विभागात ४० टक्के पदे रिक्त-
मराठी भाषा दिन साजरा करत असताना मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही आणि मराठी भाषा विभागातील ४० टक्के पदे रिक्त आहेत, ही गंभीर बाब मराठी भाषा विषयाच्या ठरावावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणून देत, तीव्र नाराजीही व्यक्त केली. मराठी भाषा विभागातील ४० टक्के पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील अनेक सचिव, अधिकारी यांच्या टिप्पणी मराठीत नसतात. मुख्यमंत्रीही अनेक कार्यक्रमामध्ये हिंदी, इंग्रजी भाषांत बोलतात, मराठी भाषेची उपेक्षा सुरू आहे. त्यामुळे मराठी भाषेबद्दल ठराव मांडला जात असताना, या बाबींचाही विचार व्हावा, अशी सूचनाही धनंजय मुंडे यांनी मांडली.

इतर अॅग्रो विशेष
पाऊस नसताच आला तं पुरला असताखर्च गंज झाला एक लाख रुपये, कापूस झाला साडेतीन क्...
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमल...अकोला ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील परिषदेनंतर...
भूषा विकासापासून कोसो दूरभूषा , जि. नंदुरबार ः दिवस सोमवारचा (ता. १ ऑक्‍...
..या १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती...मुंबई ः पावसाने मोठी ओढ दिल्याने निर्माण झालेल्या...
राज्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची...पुणे : महाराष्ट्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा...
बाजारात अफवा पसरवून कांदादर पाडण्याचा...नाशिक : दसऱ्यानंतर कांदा बाजारात क्विंटलला चार...
निर्यातीसाठी साखर देण्यास बॅंकांचा नकारपुणे : साखर निर्यातीसाठी केंद्र सरकारने पॅकेज...
दुर्गम ‘उमराणी’त स्वयंपूर्ण शेती  नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम धडगाव तालुक्‍यातील...
बाजारपेठ अोळखून सेंद्रिय भाजीपाला, ...आढीव (जि. सोलापूर) येथील भारत रानरूई यांनी शेतीची...
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...