दूध टँकर अपघातात तीनजण जखमी

दूध टँकर अपघातात तीनजण जखमी
दूध टँकर अपघातात तीनजण जखमी

पनवेल : सायन-पनवेल मार्गावर सकाळच्या सुमारास दुध घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघात झाल्याने काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. अपघातात 3 प्रवासी जखमी झाले असून जखमींना जवळच्याच कामोठा एम.जी.एम. रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोल्हापूरहुन दुध घेऊन सानपाडा येथील गोकुळ दूध कंपनीत जाणाऱ्या टँकरवरच्या चालकाचा ताबा सुटल्याने, टँकर कामोठा येथील उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीवर आदळला. सकाळी सहाच्या दरम्यान झालेल्या या अपघाताप्रसंगी काही प्रवासी सायन-पनवेल मार्गावरील कामोठा स्टॉपवर उभे असल्याने 3 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहीती कळंबोली वाहतुक शाखेला देण्यात आली असून वाहतुक पोलीसांनी दुपारी अपघातग्रस्त टँकरला मार्गावरुन हटवल्यानंतर मार्गावर झालेली वाहतुककोंडी सुटुन वाहतुक सुरळीत झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com