agriculture news in marathi, Marathwada dams has 76 percent waterstock, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठ्यात गत आठवड्याच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये ३ नोव्हेंबरअखेर ६४.९१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्ध आहे. २७ ऑक्‍टोबरअखेर उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का ६५.२१ टक्‍के होता.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठ्यात गत आठवड्याच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये ३ नोव्हेंबरअखेर ६४.९१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्ध आहे. २७ ऑक्‍टोबरअखेर उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का ६५.२१ टक्‍के होता.

मराठवाड्यातील मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये ६६.४२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. या प्रकल्पांपैकी माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सिनाकोळेगाव प्रकल्प तुडुंब भरले असून, येलदरी व उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात प्रत्येकी केवळ १४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. निम्न मनारची स्थिती फारशी बरी नसून, या प्रकल्पातही केवळ २३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी सात मध्यम प्रकल्पात शून्य टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सहा; तर नांदेड जिल्ह्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सोळा मध्यम प्रकल्पांपैकी लाहुकी, गिरिजा, वाकोद, अंजना, पळशी, टेंभापुरी, नारंगी या प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठाच झाला नाही. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील महालिंगी मध्यम प्रकल्पातही अख्खा पावसाळा लोटूनही उपयुक्‍त पाणीसाठ्याचा थेंबही साठला नाही. अकरापैकी केवळ सात प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा असून, ७४३ पैकी  ३२२ लघुप्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. ७५ पैकी ४५ मध्यम प्रकल्पांतही ३ नोव्हेंबरअखेर ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठ्याची नोंद घेतली गेली आहे. १५ मध्यम, २२९ लघू, तर ३ मोठ्या प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. पावसाचा टक्‍का बरा दिसत असला तरी मोजक्‍या मोठ्या व काही मध्यम प्रकल्पांची स्थिती चिंता वाढविणारी आहे. 

२६ मध्यम प्रकल्प तुडुंब
मराठवाड्यातील जालना वगळता सातही जिल्ह्यांतील २६ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील १६ पैकी ११, उस्मानाबादमधील १७ पैकी १०, लातूरमधील ८ पैकी २, नांदेडमधील ९ पैकी २; तर औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...