मागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.
ताज्या घडामोडी
औरंगाबाद : कर्जमाफीसाठी भरण्यात आलेल्या अर्जांपैकी राज्यात आधार जोडणी असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या ५४ लाख १७ हजार ७६५ आहे. मराठवाड्यातील १६ लाख ५३ हजार ३९७ शेतकऱ्यांचे अर्ज असल्याचे समोर आले असून, यापैकी १६ लाख ३ हजार ८९६ शेतकऱ्यांचे अर्ज आधारशी जोडणी करण्यात आलेले आहेत.

दीड लाखापर्यंतचे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील १० लाख ८३ हजार ९३२ शेतकऱ्यांचा समावेश होता. तर दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील १ लाख ५६ हजार १३३ शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. तसेच ४९ हजार ५०१ शेतकऱ्यांच्या अर्जाला आधार जोडलेले नव्हते, अशीही माहिती समोर आली होती.
मराठवाड्यातून ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता १६ लाख ५३ हजार ३९७ इतकी असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १६ लाख ३ हजार ८९६ शेतकऱ्यांचे आधार जोडलेले असून, ४९ हजार ५०१ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करताना आपले आधारच जोडले नसल्याची माहिती होती.
दरम्यान १ ते ६६ ची माहिती विकास सोसायट्या आणि बॅंकांकडून भरण्याचे काम सुरू आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत हे काम पूर्ण झाले असून, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ऑडिटरकडूनही तपासणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कर्जमाफीसंदर्भात सहकार विभाग, बॅंकांची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. चावडीवाचनाच्या माध्यमातून कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यातील अडचणी दूर करण्याचे काम ग्रामपंचायत निवडणुकीमुळे प्रभावित झाले होते. आता ते उस्मानाबाद जिल्ह्यातील निवडणुकीचा अपवाद वगळात सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.
- 1 of 145
- ››