agriculture news in marathi, marathwada in heavy rain | Agrowon

मराठवाड्यात १८९ मंडलांत पाऊस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जून 2018

औरंगाबाद ः मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडलांपैकी १८९ महसूल मंडलांत मंगळवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. माॅन्सूनपूर्व असलेल्या या पावसाचा जोर बीड, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत अधिक होता.

औरंगाबाद ः मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडलांपैकी १८९ महसूल मंडलांत मंगळवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. माॅन्सूनपूर्व असलेल्या या पावसाचा जोर बीड, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत अधिक होता.

मराठवाड्यातील परभणी, सेलू, जिंतूर, औंढा नागनाथ, हिमायतनगर, अंबाजोगाई, माजलगाव, केज, धारूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, भूम, वाशी आदी तालुक्‍यांतील जवळपास सर्वच मंडलांत मध्यम ते दमदार पावसाची हजेरी लागली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या लोखंडी सावरगाव मंडलात सर्वाधिक ७७ मिलिमीटर, तर त्यापाठोपाठ याच तालुक्‍यातील अंबाजोगाई मंडलात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

माजलगाव तालुक्‍यातील माजलगाव मंडलात ७० मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या निलंगा या एकमेव मंडलात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाऊस झालेल्या १८९ मंडलांपैकी १५ तालुक्‍यांत पावसाची हजेरी बऱ्यापैकी राहिली. उर्वरित भागात तुरळक, हलका पाऊस पडल्याची नोंद आहे.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्‍यात सरासरी २३ मिलिमीटर, जिंतूर येथे सरासरी १७.६७ मिलिमीटर, परभणी १९.५० मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्‍यात सरासरी १५.२५ मिलिमीटर, नांदेडमधील हिमायतनगर तालुक्‍यात सरासरी १७ मिलिमीटर, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्‍यात सरासरी ३४ मिलिमीटर, माजलगाव ३७.३३ मिलिमीटर, केज १७.१४ मिलिमीटर, धारून २५ मिलिमीटर, परळी १२.८० मिलिमीटर, लातूर जिल्ह्यातील देवणीत सरासरी ५८ मिलिमीटर, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात ३४.६७ मिलिमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये सरासरी २१.८३ मिलिमीटर, भूममध्ये १६.२० मिलिमीटर, तर वाशीत सरासरी २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तीन मंडलांत तुरळक ते हलका पाऊस पडला. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३४ मंडलांत पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २६ मंडलांत पाऊस झाला.

नांदेडमधील ८० पैकी ३९ मंडलांत पाऊस झाला. बीड जिल्ह्यात ६३ पैकी ४३ मंडलांत पावसाची हजेरी लागली. लातूर जिल्ह्यात ५३ पैकी २६ मंडलांत पाऊस पडला, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४२ पैकी १८ मंडलांत माॅन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याची नोंद आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. ५) सकाळी ८ वाजेनंतर औरंगाबाद, जालना जिल्ह्यात काही भागांत पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे वृत्त आहे.

मंडलनिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे. (पाऊस मिलिमीटरमध्ये)
गंगामसला ४०, दिंद्रुड ६३, केज २५, होळ २७, तेलगाव ३०, मोहखेड २७, परळी ४२, अंबूलगाव बु. २५, हिसामाबाद ४२, साकोळ ५२, देवणी बु. ६१, वलांडी ६३, बोरोळ ५०, कळंब ३०, इटकूर ५५, मोहा १३, गोविंदपूर २०, भूम २४, लिट १७, अम्बा २०, तेरखेड २३, पारगाव ४३.

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...