agriculture news in marathi, marathwada in heavy rain | Agrowon

नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये पावसाचे धुमशान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जून 2018

औरंगाबाद ः मृग नक्षत्राला सुरवात होण्याच्या काही तास आधी मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावासाने चांगलेच धुमशान घातले. या तीनही जिल्ह्यांतील ३८ महसूल मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामधील दहा मंडळांत तर पावसाने कहर करत १०४ ते २०८ मिलिमीटर दरम्यानचा टप्पा गाठला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मंडळात सर्वाधिक २०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद ः मृग नक्षत्राला सुरवात होण्याच्या काही तास आधी मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावासाने चांगलेच धुमशान घातले. या तीनही जिल्ह्यांतील ३८ महसूल मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामधील दहा मंडळांत तर पावसाने कहर करत १०४ ते २०८ मिलिमीटर दरम्यानचा टप्पा गाठला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मंडळात सर्वाधिक २०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जूनच्या सुरवातीपासूनच अपवाद वगळता मराठवाड्यातील बहुतांश भागांत पूर्वमोसमी पावसाने कमी अधिक प्रमाणात बरसण्यास सुरवात केली होती. जूनमध्ये पहिल्या सात दिवसांतील मंडळनिहाय पडलेल्या पावसाची तोपर्यंत अपेक्षित पावसाशी तुलना केली असता २२८ मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत शंभर टक्‍के पाऊस पडला होता. ५९ मंडळांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, ५९ मंडळांत ५० ते ७५ टक्‍के, २७ मंडळांत २५ ते ५० टक्‍के तर ४८ मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पावसाची हजेरी लागली होती. शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या पावसाच्या नोंदीनुसार नांदेड जिल्ह्यातील पाच, लातूर जिल्ह्यातील २१ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ मंडळांत ६५ ते २०८ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. जोरदार ते अतिजोरदार झालेल्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुरोरी जवळील पाचफूला ओढा तर जेवळी येथील बेन्नीतुरा नदीपात्र भरून वाहू लागली.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, हतगाव, हिमायतनगर, देगलूर, बिलोली धर्माबाद, नायगाव मुखेड आदी तालुक्‍यात सरासरी ११ ते ४९ मिलिमीटरदरम्यान पाऊस पडला. जिल्ह्याची सरासरी २५.१० मिलिमीटर राहिली. परभणी जिल्ह्यातील पालम, पूर्णा व गंगाखेड तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्‍यात सरासरी ११.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात सरासरी ५५.५१ मिलिमीटर पाउस पडला. तर उस्मानाबाद जिल्ह्याची पावसाची सरासरी ३७.८८ मिलिमीटर राहिली. पेरणी करण्यास उपयुक्‍त ठरणाऱ्या या पावसामुळे त्या भागात पेरणीची कामे गती पकडण्याची शक्‍यता आहे.

जलमय झाला उमरगा व परिसर
उमरगा (जि. उस्मानाबाद) शहर व तालुक्‍यात शुक्रवारी (ता. ८) मध्यरात्री व पहाटे झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण शहर जलमय झाले. शेत-शिवारातील बांध फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील जवळपास दोनशे घरांत पाणी घुसल्याने संसारोपयी साहित्याचे मोठे नुकसान झाले. शेत शिवारातून आलेल्या पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर थांबल्याने मध्यरात्री दोन नंतर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून अधून-मधून वादळी वाऱ्यासह हलक्‍या पावसाने उमरगा तालुक्‍यात हजेरी लावण्याचे काम केले. गुरुवारी रात्री दहापासून ढगाळ वातावरण होते. रात्री साडेअकराच्या सुमारास हलका पाऊस सुरू होता. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. उमरगा मंडळात मराठवाड्यातील सर्वाधिक २०८ मिलिमीटर पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले.

अतिवृष्टी झालेली मंडळे (पाऊस मिलिमीटरमध्ये)
नांदेड जिल्हा : हदगाव ८४, तामसा ११२, बिलोली ८०, लोहगाव ७०, धर्माबाद ८६, 
लातूर जिल्हा : औसा १०४, लामजणा १२५, किल्लारी १२८, मातोळा ८३, भादा ७०,
किनीथोट ८२, बेलकुंड ९६, मोघा १०५, हेर ८०, देवर्जन ७०, वाढवण बु.७६

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...